Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*तगरखेडा व्हाॅलीबाॅल संघाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक*



 *तगरखेडा व्हाॅलीबाॅल संघाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक*



निलंगा :-( प्रतिनिधी)



क्रीडा मंत्रालय भारत सरकार,नेहरू युवा केंद्र लातूर द्वारा आयोजित

 जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत लातूर  येथे आयोजित केलेल्या  व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये साहारा  स्पोर्ट्स तगरखेडा  या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला या संघाचे प्रशिक्षक म्हणून दिपक पाटील हे काम पाहिले. 





यापूर्वी निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथे नेहरू युवा केंद्र लातूर द्वारा आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत तगरखेडा व्हाॅलीबाॅल संघाने द्वितीय क्रमांक पटकावला होता.


साहारा स्पोर्ट्स संघांचे प्रशिक्षक म्हणून दिपक पाटील यांनी कार्य अद्वितीय आहे. या संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला. 



या संघात बालाजी गुत्ते, पृथ्वीराज पाटील, संतोष बोरसुरे, शिवशंकर कल्याणे, श्रीकांत बेलूरे, समीर शेख, मुक्रम मत्तीशे ,ऋतूराज पाटील, प्रसाद डावरगावे, प्रमोद निरमनाळे, विनायक उडबळे, योगेश बेलूरे हे खेळाडू आहेत. खेळाडूंचे व प्रशिक्षकाचे आम्ही तगरखेडकर ग्रूप, चांदनी चौक मित्र परिवारातर्फे  कौतुक अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments