*गॅस सिलेंडरची चढ्या दराने विक्री;अंकुश घाला अन्यथा तीव्र आंदोलन*
शिवसेना,युवासेनेचा इशारा
निलंगा:-(प्रतिनिधी)
निलंगा तालुक्यातील गॅस एजन्सी धारक मनमानी भावाने विक्री करत आहेत त्याच्यावर तात्काळ प्रशासनाने अंकुश घालावा अन्यथा युवासेना व शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
गॅसची शासकीय किंमत आज रोजी 14.02 किलोचा दर हा घरपोच सेवा दिली तर 924 रुपये 50 पैसे, व गॅसएजन्सी मधून जर गॅस दिला तर 897 रुपये हा दर आहे. असे असताना निलंगा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकाकडून 960, 970, 980 रुपये घेतली जातात, पावती दिली जात नाही व वजनही केले जात नाही. शिवाजी गॅस एजन्सीबद्दल याबाबत मागे तक्रार दिली होती. पुरवठा विभागाकडून नोटीस काढून ही आजतागायत बेकायदेशीर रित्या चढ्या भावाने निलंगा तालुक्यातील गॅसएजन्सीधारक विक्री करत आहेत. त्याबाबत अनेक गावातील लोकांच्या तक्रारी आहेत. शासकीय नियमाप्रमाणे 924 रुपये 50 पैसे हा दर घरपोच सेवा देण्यासाठी आहे पण घरपोच सेवा न देता गॅस एजन्सीवरच गॅस दिला जातो. घरपोच सेवा दिली जात नाही, पैसे मात्र घरपोच सेवेचे घेतले जातात. व पावतीही दिली जात नाही. गॅसएजन्सीवर गॅस घेण्यासाठी गेल्यानंतर घरपोच सेवेचे 27 रुपये 50 पैसे हे गॅस एजन्सी धारकाने ग्राहकांना परत करायचे आहेत पण ते पैसे गॅस एजन्सीधारक ग्राहकांना परत देत नाहीत. घरपोच सेवेचे पैसे घेतात पण घरपोच सेवा देत नाहीत. अनेक गावांमध्ये गॅस एजन्सी धारकांनी नेमलेल्या एजंटांमार्फत मनमानी भावाने गॅस दिला जातो त्यावर कोणाचेही अंकुश राहिले नाही. असे एजंट लोकांशी उद्धटपणे बोलतात. पुरवठा विभागाला निवेदन देऊन ही त्यांच्यावर काहीही कार्यवाही केली गेली नाही. अशा लाखो रुपयाचे भ्रष्टाचार करणाऱ्या गॅसएजन्सी विरोधात व एजंटावर कडक कार्यवाही करावी. अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने मा. मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली जाईल अशा अशयाचे निवेदन शिवसेना व युवा सेनेच्या वतीने नायब तहसीलदार महापुरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील नाईकवाडे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, महिला तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी, शहरप्रमुख दैवता सगर, फारुख पांढरे, हुजुर मुजावर, लायकपाशा शेख, बस्वराज पाटील, शिवानंद लादे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments