पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने संघटन करावेत -जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने.
निलंगा:-( प्रतिनिधी)
निलंगा तालुक्यातील होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज दिनांक 08. 01. 2022 रोजी शासकीय विश्रामगृह निलंगा येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन, पक्षबांधणी करावी यासंदर्भात आदेश दिले.
निलंगा विधानसभेत आगामी होणाऱ्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकी संदर्भामध्ये पक्षबांधणी, पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी शाखाप्रमुखा पासून ते विभागप्रमुखापर्यंत सर्वांनी पक्षवाढीसाठी कामाला लागावे व येणाऱ्या काळात पक्षसंघटन मजबूत करावे असे आदेश निलंगा येथील शासकीय विश्रामगृह बैठकीप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रत्येक जिल्हापरिषद मतदारसंघाचा आढावा घेऊन पुढील पक्षसंघटन करण्याची जबाबदारी देण्यात आली. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील यांना शेडोळ जिल्हा परिषद, अंबुलगा जिल्हा परिषदेची पक्ष संघटनेची जबाबदारी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, हुजूर मुजावर, बालाजी सगर, शिवाजी शिंदे तसेच औराद जिल्हापरिषदेची जबाबदारी कन्हैया पाटील, अमोल ढोरसिंगे, हलगरा जिल्हा परिषदेची जबाबदारी हरिभाऊ सगरे, शिवाजी शेळके, मनोज तांबाळे यांना तर निटूर जिल्हा परिषदेची जबाबदारी लायकपाशा शेख, प्रवीण घोरपडे, सोपान लोहरे यांना देण्यात आली. सरवडी व मदनसुरी जिल्हा परिषदेची जबाबदारी बालाजी माने, अशोक सूर्यवंशी तर कासार बालकुंदा जिल्हा परिषदेची जबाबदारी संजय बडूरे, रवी ताबाळे, बालाजी मरे यांना तर कासारशिर्शीची जबाबदारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य व शिवसेना तालुकप्रमुख अविनाश दादा रेशमे यांना देण्यात आली. निलंगा शहराच्या संघटनाची जबाबदारी ईश्वर पाटील, सुनील नाईकवाडे, हरिभाऊ सगरे,प्रशांत वाजरवाडे, अजिंक्य लोंढे, मुस्तफा शेख यांना देण्यात आली. याप्रसंगी या बैठकीला शिवसेनेचे उजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य, तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रल्हाद भोपी, हरिभाऊ सगरे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, युवसेना तालुकाप्रमुख प्रशांत वाजरवाडे, व्यापारीतालुका संघटक प्रसाद मठपती, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी, शहरप्रमुख दैवता सगर , अमोल भोसले, अजिंक्य लोंढे, मुस्तफा शेख, जोहर पांढरे, चंद्रहास नलमले,तसेच शिवसेना,युवासेना पदाधिकारी व इतर सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments