*उद्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे नियम लागू*
मुंबई-
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात काही
आवश्यक निर्बंध लावण्यात आले आहेत त्यानुसार शाळा कॉलेज हे 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत तर स्विमिंग पूल, जिम,
स्पा, ब्युटी पार्लर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पार्क , प्राणी पक्षी संग्रहालय , किल्ले हे बंद असणार आहेत तर मॉल व कॉम्प्लेक्स हे 50 टक्के मर्यादेत सुरु असणार आहेत , राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी हे आदेश काढले असून
त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यास सांगितले आहे.
सलून,खासगी कार्यालय, पिक्चर थीयटर हे 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील तर रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु आहे.
असे असतील नवीन नियम-
-सलून, खासगी कार्यालये, थिएटर क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने
सुरु राहतील.
-सार्वजनिक वाहतूकीत दोन्ही दडोस घेतलेल्यांनाच परवानगी.
-शाळा, कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद
-हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु
राहतील,
-स्विमींग पूल, स्पा, जिम पूर्णपणे बंद
-मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे पूर्णत: बंद
-रात्री 11 ते सकाळी पाच वाजेवर्यंत असणार नाईट कप!. पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित फिरू शकणार नाहीत.
-लग्न समारंभासाठी 50, अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्ती,
कार्यक्रमांसाठी 50 लोकच उपस्थित असतील.
-शाळा, खासगी क्लासेस ऑनलाइन पद्धतीने सुरु राहतील.
-शॉपिंग मॉल रात्री 10 ते 8 वाजेपर्यंत बंद असतील.
-मालवाहतूकीवर कोणतीही बंधने नाहीत.
-लोकल वाहतूकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

Post a Comment
0 Comments