*तेरणा ,मांजर, तावरजा नदीकाठच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावे लागेल.*
माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर.
लातूर :-( प्रतिनिधी)
आसमानी व सुलतानी संकटांमुळे नदीकाठच्या शेतकऱ्याची पीक आणि जमीन वाहून गेली. महाराष्ट्र शासन आजतागायत नदीकाठच्या शेतकऱ्यांना भरीव मदत देऊ शकले नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील तेरणा, मांजरा ,तावरजा नदीकाठच्या प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्याची संवाद साधला जाणार आहे व त्यानंतर संघर्षाची पुढील दिशा ठरविण्यात येईल अशी माहिती आज लातूर येथे भारतीय जनता पार्टीच्या झालेल्या बैठकीत कार्यकर्ता पदाधिकारी लोक प्रतिनिधी पुढे बोलताना भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी व्यक्त केले यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार रमेश आप्पा कराड आमदार अभिमन्यु पवार जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे उपाध्यक्ष भारत बाई साळुंखे, सरचिटणीस संजय दुर्वे, सभापती रोहिदास वाघमारे गोविंद चिलकुरे जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य पंचायत समितीचे सभापती उपसभापती सदस्य सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments