“रोटरी क्लब ऑफ लातूर होरायजनची तांबाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट”
लातूर:-(प्रतिनिधी)
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५०० शाळांमध्ये “बाला” उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे. या उपक्रमातर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांबाळा ता.निलंगा जि.लातूर ही शाळा महाराष्ट्राला दिशादर्शक ठरली आहे. या शाळेला रोटरी क्लबऑफ लातूर होरायझनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन येथील बाला उपक्रमातील ४० व इतर नाविण्यपूर्ण उपक्रमाची पाहणी करुन शाळेचे मुख्याध्यापक दयानंद मठपती, संतोष वाघमारे, श्रीमंत संगनाळे, लक्ष्मण चोले, दामोदर मोहारे, रोहिदास देवर्षे व नामदेव चोले या शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझनचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय गवई, सचिव निळकंठ स्वामी, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ.विजयभाऊ राठी, डॉ.मल्लिकार्जुन हुलसुरे, विश्वनाथ स्वामी (सावळे), निजाम हुच्चे, महादेव पांडे, शेख शमशोद्दीन, मंगलताई डोंगरे आणि आरती कांबळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत गाडगेबाबा आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर शाळेचे मुख्याध्यापक दयानंद मठपती यांनी बाला उपक्रमाअंतर्गत असणाऱ्या विविध विद्यार्थीपयोगी उपक्रमाची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ लातूर होरायजन आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब), लातूर द्वारा या शाळेला निसर्गरक्षक इन्सीनेटर आणि सॅनिटरी पॅडचे मोफत वितरण करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.विजयभाऊ राठी म्हणाले की, या शाळेच्या उपक्रमाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तेव्हा सॅनिटरी पॅडची अधिकाधिक जनजागृती विद्यार्थ्यात मार्फत गावातील महिलांमध्ये करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी क्लबचे सचिव निळकंठ स्वामी यांनी क्लब मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ.संजय गवई म्हणाले की, तांबाळा शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे भाग्य आहे त्यांना या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण देण्याचे कार्य येथील सर्व शिक्षक वृंद करीत आहे. मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असून आज विविध सर्वोच्च मानाच्या पदव्या प्राप्त केलेल्या आहे तेव्हा या शाळेचा आदर्श लातूर जिल्ह्यातील शाळा सोबतच महाराष्ट्रातील सर्व शाळांनी घ्यावा असे सांगून दयानंद मठपती व त्यांच्या सर्व सहकारी,ग्राम पंचायत,शाळा व्यवस्थापन समिती व गावातील दानशूर व्यक्तिंसह यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. तसेच या शाळेला आवश्यक असणारी पाण्याची टाकी व इतर विविध साहित्य क्लब मिटिंगमध्ये चर्चा करून उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले
या कार्यक्रमाला बसवराज पाटील, ओमकार स्वामी,अमृत तुमकुटे, शिवादादा व्हन्नाळे, योगेश स्वामी सखाराम सखाराम खुरपे, बचत गटातील महिला भगिनी,अंगणवाडी ताई,आशा कार्यकर्ती व शिक्षक उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक दयानंद मठपती यांनी केले

Post a Comment
0 Comments