Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न*

 


*15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न*



*नागरिकांनी डिजीटल पध्दतीने बँकीग व्यवहार करतांना काळजी पूर्वक करावेत*

     - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे प्रतिपादन


          * लातूर ( प्रतिनिधी) :- आजच्या डिजीटल युगामध्ये डिजीटल पध्दतीने बँकीग व्यवहार करतांना नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच इतर कोणत्याही व्यक्तीला ओटीपी शेअर करु नये. या बाबत शासकीय विभागांनी शाळा , महाविद्यालयांनी निबंध स्पर्धा, कार्यशाळा आयोजित कराव्यात. ऑनलाईन ट्राझेक्शनाबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज  असल्याचे सांगून प्रत्येक नातेवाईक, मित्र परिवार यांच्याशी याबाबत चर्चा करुन सर्वांना हा विषय समजावून सांगण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रतिपादन केले.


              आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक निवारण मंचच्या प्रभारी अध्यक्षा रेखा जाधव, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील, महाराष्ट्र ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद तिवारी, विभागीय ग्राहक पंचायतचे विभागीय अध्यक्ष सतीश, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ॲड. एस.व्ही. तपाडिया, ॲड. अनिल जवळकर , ॲड. रविंद्र राठोडकर, ॲड . सत्यनारायण दिवाण, धान्य खरेदी अधिकारी एस. एन. भिसे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सावंत आदिं विविध विभागाच्या विभाग प्रमुख, नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.


             जागतिक ग्राहक दिन म्हणून जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. शासनाने फेर डिजीटल फायनान्स ( Fair Digital Finance) ही संकल्पना निश्चित केली आहे. या संकल्पनेनुसार सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, प्रदर्शन शिबीरे, चर्चासत्रे, कार्यशाळा, ग्राहक संरक्षण विषयक निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा अशा प्रकारचे विविध ग्राहक प्रबोधनचे कार्यक्रम आयोजित करावेत, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.


            जिल्हा ग्राहक निवारण मंचच्या प्रभारी अध्यक्षा रेखा जाधव म्हणाल्या की, 670 प्रकरणे प्रलंबित असून आजपर्यंत 68 लाख रुपये ग्राहकांना न्याय मिळवून दिला आहे. ग्राहकांचा हक्क अबाधित राहण्यासाठी हा कायदा आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये ग्राहक ज्या ठिकाणी राहतो, त्याच ठिकाणी तक्रार करता येते. ग्राहक राजा ग्राहकांच्या कायद्याबाबत म्हणावा, तेवढा जागृत नाही, त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.


        ॲड. सत्य नारायण तापडिया म्हणाले की, ( Fair Digital Finance) ही संकल्पनेची व्याप्ती खुप मोठी आहे. डिजीटलच्या माध्यमातून जग आपल्याला जवळ झाले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या म्हणजेच दोन वर्षापुर्वी डिजीटल माध्यम वापरण्याचे प्रमाण केवळ 47 टक्के होते. ते आता दोन वर्षानंतर 90 टक्क्यावर येवून पोहचले आहे. प्रभावी आर्थिक ग्राहक संरक्षण महत्वाचे आहे. ऑनलाईन व्यवहार करीत असतांना दक्ष राहून करणे व त्या दृष्टीने प्रत्येक ग्राहकांनी कार्य करणे आवश्यक आहे. ऑनलाईनमुळे आपले आर्थिक व्यवहार जितके सुलभ झाले आहे, तेवढेच नुकसानदायकही झाले आहे. त्यासाठी प्रत्येकांनी आपल्या दृष्टीने सुरक्षित असणारे पर्याय पहावेत. यासाठी जागतिक पातळीवर  मंथनही सुरु आहे. याच प्रबोधन महत्वाचे आहे. प्रत्येक नागरिकांनी 10 व्यक्तींना या कायद्याची माहिती देवून प्रबोधन करण्याचेही सांगितले.


          ॲड. अनिल जवळकर म्हणाले की, प्रत्येकी व्यक्ती डिजीटल झालेला आहे. डिजीटलच्या युगात ग्राहकांनी जागरुक रहायला हवे. दूकानदार, कंपन्या ग्राहकांची फसवणूक करित असतात यासाठी प्रत्येकांनी जिल्हा ग्राहक निवारण मंचची मदत घ्यावी, असेही आवाहन श्री. जवळकर यांनी केले.

  यावेळी दत्तात्रय मिरकले, अभिजीत आवटे , प्रल्हाद तिवारी यांचीही मनोगतही यावेळी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments