Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत प्रलंबित असलेला डाटा दुरुस्तीसाठी 25 मार्च रोजी कँम्पचे आयोजन*

 


जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत प्रलंबित असलेला डाटा दुरुस्तीसाठी 25 मार्च रोजी कँम्पचे आयोजन    


लातूर :-  लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कुटूंबांला प्रतिवर्षे रुपये 6 हजार इतके आर्थिक सहाय्य तीन टप्प्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत लातूर जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये प्रलंबित असलेला डाटा दुरुस्ती संदर्भात 25 मार्च, 2022 रोजी कँम्प आयोजित करण्यात आलेला आहे. 


तरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी डाटा दुरुस्तीमुळे आपल्याला लाभ मिळत नसेल, तर आपण आपले बँक पासबुक, आधारकार्ड, जमिनीचा सातबारा व आठ अ चा उतारा इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेवून शुक्रवार दिनांक 25 मार्च, 2022 रोजी आपल्या गावात आयोजित डाटा दुरुस्ती कँम्पमध्ये उपस्थित राहून वरील कागदपत्रासह कँम्प प्रमुखाला भेटावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments