*म.बसवेश्वरमध्ये रासेयो सल्लागार समिती बैठक संपन्न*
लातूर :-(प्रतिनिधी)
भारतामध्ये २४ सप्टेंबर १९६९ रोजी राष्ट्रीय सेवा योजना सुरू झाली. त्यानंतर लागलीच शैक्षणिक वर्ष १९७१-७२ पासून महात्मा बसवेश्वर महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना सुरू झाली. सध्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती उत्सव साजरा केला जात आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रासेयो विशेष शिबिर घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्यामुळे रासेयो सल्लागार समितीची बैठक महाविद्यालयातील प्राचार्य कक्षामध्ये प्राचार्य डॅा.सिद्राम डोंगरगे यांच्या मार्गदर्शनानूसार नुकतीच संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॅा.बि.एम.गोडबोले हे होते तर सल्लागार समितीचे सन्माननीय सदस्य माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ.सोमनाथ रोडे, माजी कार्यक्रमाधिकारी प्रा.बी.एस.पळसकर, दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार संदीप शिंदे, दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक तथा वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पत्रकार प्रा.योगेश शर्मा, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा उमा व्यास, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ. संजय गवई आणि डॉ.टि.घन:श्याम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले
यानंतर डॉ.रत्नाकर बेडगे यांनी मागील बैठकीचा इतिवृत्तांत वाचून दाखवला आणि विशेष शिबिरा संबंधी सामूहिक चर्चा करून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मौजे हासेगाववाडी ता.औसा जि.लातूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सहकार्याने सात दिवसीय शिबिर घेण्याचे ठरविण्यात आले असून या शिबिरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवला अनुसरून महिला मेळावा, युवक प्रबोधन कार्यशाळा, एकल कोरोना महिला मेळावा, सर्वेक्षण, पशु चिकित्सा शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन आणि पाणलोट क्षेत्र विकास संबंधी कार्य करण्यासंबंधी चर्चा झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रत्नाकर बेडगे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय डॉ.संजय गवई तर आभार डॉ. शिवप्रसाद डोंगरे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments