“तथागत भगवान बुद्धाने जगाला मैत्री भावना दिली”
भदंत पय्याबोधी थेरो
लातूर:-( प्रतिनिधी)
संपूर्ण विश्वाला तथागत भगवान बुद्धाने मैत्री भावना दिली. आज जगामध्ये मैत्री भावना जोपासणे अत्यंत आवश्यक आहे कारण यामध्येच मानवी कल्याण सामावलेले आहे असे प्रतिपादन श्रामनेर प्रशिक्षण केंद्र, खुरगाव (नांदुसा) ता.जि.नांदेड येथील भदंत पय्याबोधी थेरो यांनी केले.
बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट,लातूर द्वारा फाल्गुन पौर्णिमा व धम्मदेसना कार्यक्रम महाविहार धम्म केंद्र सातकर्णी नगर, रामेगाव येथे संपन्न झाला यावेळी ते धम्मदेसना देताना बोलत होते
हा कार्यक्रम बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी ट्रस्टचे सचिव भदंत पय्यानंद, भदंत श्रद्धानंद, प्रमुख अतिथी डॉ.अजय ओव्हाळ, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन करडखेलकर,डॉ.सुधाकर गुळवे, राजेंद्र निकाळजे, राजेसाहेब सवाई, आर.पी. गायकवाड, पांडुरंग अंबुलगेकर, जी.एस.साबळे, डॉ.दुष्यंत कटारे आणि प्रा.देवदत्त सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुजा करुन त्रिशरण पंचशिल व वंदनेने करण्यात आली.
पुढे धम्मदेशना देताना भदंत पय्याबोधी थेरो म्हणाले की, मानवी जीवनात शील पालन महत्त्वाचे आहे. विपश्यना मानवी कल्याणाचा मार्ग आहे. एक भिक्षू संपूर्ण देशाला बुद्धमय करू शकतो. मानवी कल्याणासाठी संस्कार महत्त्वाचा आहे. आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कल्याणकारी धम्म दिला. असे ते म्हणाले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक भिक्खू पय्यानंद धम्मदेशना देताना म्हणाले की, वर्तमानकाळात बौध्द धम्म वाढीसाठी बौध्द अनुयायांनी बौध्द धम्माचा अभ्यास, चिंतन व कृतिशील आचरण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी डॉ.अजय ओव्हाळ म्हणाले की, मानवी जीवनात आरोग्य महत्वाचे आहे. आपण आपल्या मनाची सकारात्मक मशागत केली पाहिजे आणि ट्रस्टद्वारा समाजपयोगी विविध सामाजिक उपक्रम राबविले पाहिजे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात डॉ.सुधाकर गुळवे, राजेंद्र निकाळजे, शृंगारे, राजेसाहेब सवाई विलास घारगावकर वैष्णवी घारगावकर यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.विजय अजनीकर यांनी केले, प्रास्ताविक डॉ.दुष्यंत कटारे यांनी तर आभार प्रा.देवदत्त सावंत यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिरुध्द बनसोडे, उदय सोनवने, डॉ.अरुण कांबळे, डॉ.प्रीतम सोनवणे, डॉ.संजय गवई, परमेश्वर आदमाने, राहुल सोनवने, विशाल वाव्हुळे, निलेश बनसोडे आणि बालाजी धायगुडे आदींनी परिश्रम घेतले. भंतेजीच्या आशीर्वादाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Post a Comment
0 Comments