महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील ग्रंथालयीन कर्मचाऱ्या तर्फे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांचा सत्कार
लातूर :-(प्रतिनिधी)
येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांतर्फे महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडद्वारा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये विद्यापीठ तज्ञ समितीद्वारे करण्यात आले यामध्ये “अ" श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन ग्रंथालयात यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आय.क्यु.ए.सी.चे समन्वयक डॉ.बाळासाहेब गोडबोले, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.संजय गवई, मधुकर निकुंबे, मदन कलबोने, गोरख पाखरे, शुभांगी अंकुलगे (सांगवे) आणि विजयालक्ष्मी शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे म्हणाले की, शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षणामध्ये गव्हर्नन्स आणि पॉलिसी मेकिंग निकष, सामाजिक व आर्थिक निकष आणि प्रशासकीय निकषामध्ये आपल्याला शंभर टक्के गुण प्राप्त केले आहे. तर पायाभूत सुविधा आणि विद्यार्थी विकास निकष, आर्थिक व्यवस्थापन निकष व शैक्षणिक विकास निकष यामध्ये “अ” श्रेणी प्राप्त केली आहे. हे प्रमाणपत्र शैक्षणिक वर्ष २०२५ पर्यंत मान्यता प्राप्त राहील. आपल्याला शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षणामध्ये “अ” श्रेणी प्राप्त झाली हे आपण केलेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे कारण आपल्या महाविद्यालयांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी सामूहिक भावनेतून कार्य करतात.
यावेळी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.शिवप्रसाद डोंगरे व डॉ.संजय गवई यांनी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.बी.एम.गोडबोले यांनी केले तर आभार शुभांगी अंकुलगे (सांगवे) यांनी मानले.


Post a Comment
0 Comments