*पाण्याची बचत म्हणजेच 'पाण्याची निर्मिती'- दयानंद मठपती*
*ता़ंबाळा जि.प.शाळेत 'जागतिक जल दिन' साजरा*
निलंगा :-( प्रतिनिधी)
तांबाळा ता.निलंगा जि.लातूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज 'जागतिक जल दिन' साजरा करण्यात आला.जल दिनानिमीत्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी 'पाणी हे जीवन असून त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन,नैसर्गिक प्रवाह,जलाशय,कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करेन.पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची प्रतिज्ञा केली.'जागतिक जल दिन' कधीपासून व का साजरा कला जातो याची माहिती नामदेव चोले यांनी सांगितली.पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मीती असे मुख्याध्यापक दयानंद मठपती यांनी सांगितले.वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवला पाहिजे.इमारतीवर पडलेल्या पावसाचे पाणी,सांडपाणी यांचे पुनर्भरण,शेतीला बांधबंदिस्ती करुन आपण वाहून जाणा-या पाण्याला अडवून जमिनीत मुरवू शकतो असे दयानंद मठपती म्हणाले.संतोष वाघमारे व श्रीमंत संगनाळे यांनीही माहिती सांगितली.दामोधर मोहारे व रोहिदास देवर्षे यांनी बाला उपक्रमात तयार केलेले 'रेन वाटर हार्वेस्टींग' व शाळा परिसरात खोदलेले 'सलग समतल चर' प्रत्यक्ष दाखवून पाणी कसे अडविले जाते व जमिनीत मुरविले जाते याची सविस्तर माहिती सांगितली.आभार लक्ष्मण चापाले यांनी मानले.



Post a Comment
0 Comments