आजचाच तो दिवस...
22 मार्च 1982 रोजी आजच्या दिवशीच . "मी...अण्णासाहेब पाटील लाखो मराठा बांधवांच्या साक्षीने शपथ घेतो की,"
या महाराष्ट्र सरकारने जर " मराठा समाजाला सूर्य उगवण्याच्या आत आरक्षण जाहीर नाही केले " तर दुसर्या दिवशीचा सुर्य हा अण्णासाहेब पाटील बघणार नाही... ही भिष्मप्रतिग्या लाखो लोकांच्या समोर अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी 22 मार्च 1982 रोजी घेतली... शपथ घेत असताना कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या एका डोळ्यात अश्रु तर दुसर्या डोळ्यात अंगार होता... की लाखो मराठा समाज एकञ येऊन सुद्धा निर्लज्ज सरकार आपली एकही मागणी मान्य करत नाही...
23 मार्च 1982 रोजी सकाळी या मराठयांच्या क्रांतीसुर्याने आपला शब्द खरा करून दाखवला... त्यांनी आपल्या राहत्या घरी आमदार असताना फक्त आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्वतःच्या मेंदूत रिव्हॉल्वर ने गोळी झाडून घेतली... कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नंतरही अजुन मराठा समाजाला न्याय मिळाला नाही....
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हीच खरी कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांना श्रद्धांजली असेल ......🙏🚩


Post a Comment
0 Comments