*बाभळगाव येथे जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा*
लातूर :-( प्रतिनिधी)
दि 23/03/2022 रोजी बाभळगाव येथे डाॅ मिरा चिंचोलीकर यांच्या अध्यक्षतेखालील जागतिक मौखिकआरोग्य दिन साजरा करण्यात आला. काय॔क्रमाची प्रस्तावना डाॅ जितेन जैस्वाल यानी केली.या कार्यक्रमा मध्ये विविध दंत रोगाबददल माहिती देण्यात आली व तोंडाचा कर्करोग लक्षणे व उपचारा बद्द्ल डाॅ अरूण बालकुंदे दंतशल्यचिकितसक यांनी माहिती दिली, पिट आणि फिशर सिलंट कार्यक्रम बद्द्ल दंतशल्यचिकितसक डाॅ. बरेवाड यांनी माहिती दिली
तसेच 235 लाभार्थी विद्यार्थी याचे उपचार करण्यात आले .यामध्ये पिट आणि फिशर सिमेंट भरण्यात आले. यामध्ये 917 दातांवर उपचार करण्यात आले यासाठी शालेय आरोग्य तपासणी पथक 1 व 2 यांनी विद्यार्थ्यांचे नियोजन केले. या कार्यक्रमास दंतशल्यचिकितसक डाॅ. बालकुंदे ,डाॅ दायमी, डाॅ बरेवाड, डाॅ नम्रता मोरे यानी दंत उपचार केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या स्टाफ व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.



Post a Comment
0 Comments