*महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातर्फे हासेगाववाडी येथे रासेयो विशेष युवक शिबिराचे आयोजन*
लातूर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड संलग्नित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर द्वारा महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त आणि राष्ट्रीय सेवा योजना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनासाठी विशेष युवक शिबिर” हासेगाववाडी ता. औसा जि.लातूर येथे दि.२४ ते ३० मार्च २०२२ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीराचा उद्घाटन समारंभ २४ मार्च २०२२ रोजी जिल्हा परिषद, लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अभिनव गोयल यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असून प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.परमेश्वर हासबे, ज्येष्ठ विचारवंत तथा इतिहास तज्ञ प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील उपप्राचार्य प्रा.डी.जे.कदम, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील रासेयो संचालक डॉ.शिवराज बोकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे, उपप्राचार्य प्रा.मनोहर कबाडे, प्रा.बालाजी जाधव, सरपंच केवळबाई सरवदे, उपसरपंच ज्ञानेश्वर लवटे, सदस्य मुक्तेश्वर लवटे, ग्रामसेविका श्रीमती व्ही.आर.गोरे, मुख्याध्यापक जे.जी.जगदाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बैजनाथ सरवदे, उपाध्यक्ष नवनाथ लवटे, पोलीस पाटील शिवराज कोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप (आबा) लवटे, शालेय समिती अध्यक्ष खंडेराव लवटे, माजी सरपंच रामराव जोडतले व सुकेश लवटे यांची उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मा.माधवराव पाटील (टाकळीकर) हे उपस्थित राहणार आहेत.
या सात दिवसीय विशेष युवक शिबिरामध्ये श्रमसंस्कार, बौद्धिक व्याख्याने, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मेळावा, रक्तदान शिबिर, पशुरोग निदान चिकित्सा शिबिर, कलापथक, समाज प्रबोधनपर किर्तन, कळी उमलताना एकांकिका, भजन संध्या, तबला वादन, संगीत रजनी आणि देशभक्तीपर गीत गायन संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास सोबतच वृक्ष संवर्धन काळाची गरज, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मोफत सॅनिटरी पॅड व इन्सिनेटर वाटप कार्यक्रम, स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान, बालकांचे शिक्षण, संस्कार, अधिकार आणि आपण, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचे योगदान, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम आणि जल व्यवस्थापन काळाची गरज आदी विविध विषयावर प्रा.योगेश शर्मा, डॉ.श्रीकांत गायकवाड, डॉ.बी.एम.गोडबोले, डॉ.गोरोबा खुरपे, प्रवीण पाटील, डॉ.विजयकुमार सोनी, प्रदेश संघटन मंत्री पवन बेळकोने, उमा व्यास, डॉ.शीतल येरुळे, डॉ.अश्विनी रोडे, प्राचार्य डॉ.संजय वाघमारे, डॉ.यशवंत वळवी, डॉ.सदाशिव दंदे, बी.पी.सूर्यवंशी, डॉ.विजयभाऊ राठी, डॉ.गुणवंत बिरादार, डॉ.विनायक वाघमारे आदींचे मौलिक मार्गदर्शन लाभणार असून प्रा.परमेश्वर पाटील, वेदांत आडसकर, समूह जोशी, निशांत जोशी, ज्ञानेश्वर मुंडे, उत्तम भूतके, ह.भ.प.मारुती माळी महाराज (हरंगुळकर), शाहीर धम्मपाल सावंत आणि कलापंढरी टीमचे सर्व कलाकार समाज प्रबोधन करणार आहेत.
या विशेष युवक शिबिराला राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख डॉ.प्रशांत कुमार वंणजे, कुलगुरू मा.डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंग बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, जिल्हाधिकारी मा.बी.पी.पृथ्वीराज, अप्पर जिल्हाधिकारी मा.अरविंद लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, गटविकास अधिकारी यांच्या संभाव्य भेटी होणार आहे.
या शिबीराचा समारोप समारंभ दि.३० मार्च २०२२ रोजी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सहसचिव मा.विजय रेवडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून प्रमुख अतिथी म्हणून कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रमाकांत घाडगे, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, रासेयो सल्लागार समिती सदस्य प्रा.बी.एस.पळसकर, डॉ.मन्मथप्पा भातांब्रे व प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
या विशेष युवक शिबिरांमध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील स्वयंसेवक/स्वयंसेविका आणि हासेगाववाडी येथील समस्त ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे, उपप्राचार्य प्रा.मनोहर कबाडे, प्रा.बालाजी जाधव, रासेयो सल्लागार समिती सदस्य, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.संजय गवई, डॉ.टी.घन:श्याम, निमंत्रक सदस्य डॉ.गुणवंत बिरादार, मुख्याध्यापक जे.जी.जगदाडे, प्रा.शंकर भोसले, सरपंच केवळबाई सरवदे, उपसरपंच ज्ञानेश्वर लवटे, सदस्य मुक्तेश्वर लवटे यांच्यासह सर्व सन्माननीय सदस्य आणि सर्व ग्रामस्थ आदींनी केले आहे.




Post a Comment
0 Comments