*अंगणवाडी कार्यकर्ती ज्योती भंडारे महिला बालकल्याण विभागाच्या वतीने सन्मानित*
निलंगा:-( प्रतिनिधी)
लातुर जिल्हा परीषदेच्या वतीने शिक्षक व महिला बालकल्याण विभागाच्या वतीने दिला जाणारा सन्मान पुरस्कार औराद शहाजानी येथील अंगणवाडी कार्यकर्ती भंडारे ज्योती मुरारी अंगणवाडी क्रमांक १७ औराद शहाजनी निलंगा २ मधून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान पुरस्कार देण्यात आला. तो पुरस्कार उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे, मा.पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार वितरणवेळी त्यांचे वडिल सुभाष बोंडगे आई विमल बोंडगे बहिण प्रिती गडकरी भाऊजी योगेश गडकरी व त्यांचा मुलगा समर्थ गडकरी व बहिण संजना भांडारे उपस्थित होते.
तसेच हा पुरस्कार मिळाल्याने सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांनी व पालकांनी त्यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments