Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवसंपर्क अभियान* *गाव तेथे शाखा;घर तेथे शिव सैनिक*

 


*शिवसंपर्क अभियान*
*गाव तेथे शाखा;घर तेथे शिव सैनिक*
शाखेच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवा : संतोष धनावडे.
निलंगा:-(प्रतिनिधी)
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या आर्शिवादाने तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण विदर्भ मराठवाडा येथे 22 ते 25 मार्च दरम्यान शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्याची जबाबदारी खासदार धैर्यशील माने यांच्यावर देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत लातूरचे संपर्कप्रख  संजय मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, महिला जिल्हा संघटिका डॉ. शोभाताई बेंजरगे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अँड. राहुल मातोळकर यांच्या नेतृत्वात संपर्क अभियानाची निलंगा तालुक्यामध्ये सुरुवात झाली आहे.
       आज निलंगा तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये बैठक घेण्यात आली. त्यात नणंद, केळगाव, निटूर,कलांडी,औराद व बोरसुरी, हलगरा, सावरी या पंचायत समिती गणामध्ये कांदिवली पूर्व विधानसभेचे संघटक  संतोष धनावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेण्यात आल्या.त्याप्रसंगी कांदिवली पूर्व विधानसभेचे संघटक  संतोष धनावडे यांनी प्रत्येक गावातील गटप्रमुखां यापासून ते विभाग प्रमुख पर्यंत सर्वांना पक्ष संघटन, बांधणी कशी करावी, गावातील शाखेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्या कशा सोडवाव्यात, गावातील पाण्याचा प्रश्न, स्वस्त धान्य दुकानातील रेशनचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या डी पी चा प्रश्न, गावातील अंतर्गत रस्ते, गटारी,पानंद रस्ते इत्यादी प्रश्न कसे सोडवावेत,गावातील प्रत्येक व्यक्तीला असे वाटले पाहिजे की आपले प्रश्न ग्रामपंचायत ऐवजी शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून सोडवले जातात असा विश्वास वाटला पाहिजे त्या दिशेने आपण काम केले पाहिजे असे नणंद येथे आयोजित केलेल्या शिवसंवाद अभिनयनाच्या बैठकीत मत व्यक्त केले. याप्रसंगी  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोदअण्णा आर्य, शिवसेनेचे निलंगा तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे, शहर संघटक हरिभाऊ सगरे,  युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे,युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments