Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथराव वलांडे गुरूजी यांचे दुःखद निधन*



 *शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथराव वलांडे गुरूजी यांचे दुःखद निधन* 

औराद शहाजानी :- 

येथील शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथराव वलांडे गुरूजी यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार, दि.२५/०३/२०२२ रोजी दुपारी हैद्राबाद येथे दुःखद निधन झाले.औराद शहाजानी,परिसर आणि सीमावर्ती भागातील शिक्षणमहर्षी,कायद्याचे सखोल अभ्यासक,सर्वसामान्यांविषयी नितांत आदर व तळमळ असणारे,मितभाषी,नम्र,सामाजिक कार्यातील अग्रगण्य आणि ज्येष्ठ पितृतुल्य व्यक्तीमत्व म्हणून विश्वनाथराव वलांडे गुरूजी सर्वांचेच श्रद्धास्थान व सुपरिचित होते.शारदोपासक शिक्षण संस्थेच्या सर्वांगिण विकासात आणि मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजतागायतच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीत विश्वनाथराव वलांडे गुरूजी यांचे योगदान मोलाचे होते.त्यांच्या दुःखद निधनाने औराद शहाजानी व परिसराची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून दुःखद निधनाच्या वृत्ताने सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.शारदोपासक शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ,सदस्य,प्राचार्य,उपप्राचार्य,प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,नातेवाईक आणि  औराद शहाजानी व परिसरातील सर्व अबालवृद्ध हे वलांडे परिवारावर कोसळलेल्या दुःखात सहभागी आहेत.विश्वनाथराव वलांडे गुरूजी यांचा अंत्यविधी त्यांचे मूळ गाव तगरखेडा येथे शनिवार दि.२६/०३/२०२२ रोजी दुपारी एक नंतर होणार आहे असे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.





Post a Comment

0 Comments