Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*“मानवाने निसर्गासह आपला संतुलित विकास साधावा”* प्राचार्य सोमनाथ रोडे



 *“मानवाने निसर्गासह  आपला संतुलित विकास साधावा”* 

प्राचार्य सोमनाथ रोडे 


लातूर :-( प्रतिनिधी) 

वर्तमान काळामध्ये नैसर्गिक पर्यावरणात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत मानवाने आपल्या विकासासाठी नैसर्गिक पर्यावरणाची पायमल्ली केली आहे त्यामुळे आपण सर्वांनी निसर्गासह आपला संतुलित विकास साधला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे यांनी केले महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर आणि ग्रामपंचायत कार्यालय हासेगाववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 ते 30 मार्च 2022 या कालावधीमध्ये पर्यावरण नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनासाठी विशेष योग शिबिर मौजे हासेगाववाडी ता. औसा येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे हे होते तर विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.गोविंद घार, महाराष्ट्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सी.जे.कदम, सरपंच केवळबाई अंकुश सरवदे, शालेय समितीचे अध्यक्ष खंडेराव लवटे, उपप्राचार्य प्रा.मनोहर कबाडे, प्रा.बालाजी जाधव, प्रा. शिवाजी पाटील, डॉ. दिनेश मौने,  डॉ. गुणवंत बिरादार, प्रा. संगमेश्वर पानगावे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. संजय गवई, डॉ. टि . घनश्याम, उपसरपंच ज्ञानेश्वर लवटे आणि मुक्तेश्वर लवटे यांची प्रमुख उपस्थिती होती 

कार्यक्रमाचे प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.  शिवप्रसाद डोंगरे म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड संलग्नित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर आणि ग्रामपंचायत कार्यालय, हासेगाववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हासेगाववाडी येथे युवक शिबिर आयोजित करण्यात आले आहे या सात दिवसांमध्ये उद्घाटन समारंभ, श्रमसंस्कार, बौद्धिक व्याख्यान, आरोग्य शिबिरे आणि समाज प्रबोधनपर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत याचा लाभ ग्रामस्थ, युवक आणि स्वयंसेवकांना नक्की होणार आहे 

या कार्यक्रमात प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली त्याबद्दल डॉ.  गुणवंत बिरादार यांचा सत्कार करण्यात आला तसेच वर्षा रसाळ हिच्या वाढदिवसानिमित्त तिचा, सुरेखा रसाळ व भाऊ रसाळ यांचा सत्कार करण्यात आला 

पुढे बोलताना प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे  म्हणाले की, ५० वर्षीय एक झाड १५ लाख रुपयांचा ऑक्सिजन आणि मोठ्या प्रमाणात मानवाला उपयोगी वस्तू पुरवितात त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचे  आपण जतन केले पाहिजे असे ते म्हणाले 

या कार्यक्रमात प्रा गोविंद घार म्हणाले की, आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे वर्तमान काळात मानवी संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा निर्माण झाला आहे असे ते म्हणाले 

यामध्ये उपप्राचार्य प्रा.सि. जे. कदम यांनी रासेयो चळवळीचा संक्षिप्त आढावा घेतला 

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे म्हणाले की, राष्ट्रीय योजनेचे शिबीर म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची आनंददायी पर्वणी आहे.  शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास केला जातो 

या शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रा. शंकर भोसले, संतोष येचवाड, योगेश मोदी, वैजनाथ सरवदे, जे. जी. जगदाळे, प्रदीप शेळके, भीमाशंकर सुगरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments