*खुनातील फरार आरोपीला औराद शहाजानी पोलीसांनी केले जेलबंद.*
निलंगा (प्रतिनिधी )
मौजे येळणूर येथे दि.18/05/2021 रोजी पाणंद रस्त्यांच्या कारणावरुन झालेल्या वादातून मौजे येळणूर येथील रहिवासी अनिल तातेराव सोळुंके यांचा लाठ्या काठ्यांनी मारहाण व चाकूने वार करून खून करण्यात आला होता.सदर बाबत पोस्टे निलंगा गुरनं 129/21 कलम 302,307,143,147, 148,149,324, 323, 504,506,सह कलम 135 मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासुन सदर गुन्ह्यातील आरोपी फरार होते. सदर आरोपींना अटक करण्यासाठी औराद पोलीस सतत आरोपींच्या च्या मागावर होते आरोपींचा विविध ठिकाणी शोध घेत होते त्यातीलच एक आरोपी करण भिमराव सोळुंके हा गावात येणार असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांना मिळाली.मिळालेल्या बातमीची खात्री करून त्यांनी आपल्या टिमसह आरोपीच्या घराभोवती सापळा लावून आरोपी करण भिमराव सोळुंके वय-53 वर्षे रा.येळणूर यास आज मोठ्या शिताफीतीने अटक करून निलंगा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.सदरची कामगिरी सपोनि संदीप कामत बीट अंमलदार पोहेकाॅ/गिते, गोपनीय शाखेचे रविंद्र काळे,व पोकाॅ केंद्रे,डोंगरे,चालक टेळे यांनी केली.


Post a Comment
0 Comments