*हासेगाववाडी येथे पशुचिकित्सा शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
लातूर :-(प्रतिनिधी)
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, लातूर, ग्रा.पं.कार्यालय, हासेगाववाडी आणि पशुधन संवर्धन विभाग, पंचायत समिती, औसा यांच्या संयुक्त विद्यमाने हासेवाडी ता.औसा जि.लातूर येथे नुकतेच पशुचिकित्सा शिबिर हासेगाववाडी येथे घेण्यात आले याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन पशुधन विकास अधिकारी (औसा) डॉ.हिरालाल निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंचावर डॉ.दत्तात्रय हराळकर, डॉ.किशोर जाधव, डॉ.एकनाथ भोये, डॉ.स्वामी, डॉ.शेख, सरपंच केवळबाई सरवदे, उपसरपंच ज्ञानेश्वर लवटे, डॉ.गुणवंत बिरादार, डॉ.विनायक वाघमारे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.संजय गवई आणि प्रा.आनंद खरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती
या शिबिरांमध्ये एकूण १५६ पशुधनाची तपासणी करण्यात आली यामध्ये 63 जनावरावर औषधोपचार करण्यात आले. यात 36 पशुची गर्भ तपासणी करण्यात आली. 19 पशूंची वंध्यत्व तपासणी करण्यात आली. तर 15 लहान शस्त्रक्रिया करून 10 पशूंचे खच्चीकरण करण्यात आले तर 15 जनावरांवर जंतनाशक औषध उपचार करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना डॉ.हिरालाल निंबाळकर म्हणाले की, आज पशुधन व्यवस्थापन शास्त्रीय दृष्टिकोन ग्रामस्थांनी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. उसाचे वाडे हे पशूचे पोष्टिक खाद्य नाही. आज जनावरांना संतुलित व सकस आहाराची नितांत आवश्यकता आहे असे ते म्हणाले
या शिबिरामध्ये डॉ.दत्तात्रय हराळकर, डॉ.गुणवंत बिरादार, डॉ.विनायक वाघमारे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.संजय गवई यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ.रत्नाकर बेडगे आणि आभार डॉ.शिवप्रसाद डोंगरे यांनी मानले
या शिबिराच्या यशस्वितेसाठी एच.आर.देशमुख, डी.एस.मोरे, सचिन गावडे, राजेश कदम, मुक्तेश्वर लवटे, खंडेराव लवटे, योगेश मोदी, संतोष येचवाड, कृष्णा ठाकूर, विकास बुधवले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पशुधन कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिरार्थी यांनी अथक परिश्रम घेतले


Post a Comment
0 Comments