“निरोगी जीवनासाठी शरीरशुध्दी सोबत मन:शुध्दी आवश्यक”
ह.भ.प.मारोती माळी महाराज (हरंगुळकर) यांचे प्रतिपादन
लातूर :-( प्रतिनिधी)
आपण निरोगी राहण्यासाठी शरीरशुध्दी नियमितपणे करतो परंतु त्यासोबत प्रत्येकाने मन:शुध्दी करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ह.भ.प.मारोती माळी महाराज (हरंगुळकर) यांनी प्रतिपादन केले
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, लातूर आणि ग्रा.पं.कार्यालय हासेगाववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनासाठी विशेष युवक शिबिर” मौजे हासेगाववाडी ता.औसा येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये समाज प्रबोधन अंतर्गत ते मार्गदर्शन करताना बोलत होते
यावेळी विचार मंचावर रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.संजय गवई आणि भजनी मंडळातील सदस्य यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलतांना प्रा.मारुती माळी म्हणाले की, काम, क्रोध, मोह आणि माया हे मानवाच्या विकासातील प्रमुख अडथळे आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी परस्परांशी प्रामाणिकपणे मैत्री भावना जोपासून परस्परांना वेळोवेळी सहकार्य केले पाहिजे तरच कौटुंबिक सौख्य निर्माण होते असे ते म्हणाले.
यावेळी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.शिवप्रसाद डोंगरे व डॉ.संजय गवई मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी दातके केले तर प्रास्ताविक डॉ.संजय गवई यांनी केले तर आभार डॉ.शिवप्रसाद डोंगरे यांनी मानले. या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला हासेगाववाडी येथील ग्रामस्थ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक/स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या


Post a Comment
0 Comments