*बलिदान मास आणि शहिद दिन अभिवादानपर रक्तदान शिबिर संपन्न*
लातूर :-( प्रतिनिधी)
सक्षम फाऊंडेशन तसेच रा.स्व.संघ,सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्ट, हत्ते नगर मित्र मंडळ, बटरफ्लाय प्री स्कुल आणि धर्मवीर शंभूराजे गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास आणि शहिद दिनानिमित्त अभिवादनपर हत्ते नगर भागातील श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये दि.२७ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४१ जनांनी रक्तदान केले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशास पुष्पहार आणि छ.संभाजी महाराज, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेत पुष्प अर्पण करून सुरुवात करण्यात आली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचे खुप खुप आभार तसेच शिबिरासाठी श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विशेष आभार, यावेळी सक्षम फाउंडेशनचे अध्यक्ष संभाजी कांबळे तसेच रोहन हत्ते, शुभम जाधव, सुरज व्यवहारे, प्रसाद खानापुरे, प्रकाश बरबोले, शंकर लांडगे, कुलदीप चौंडे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments