*तगरखेडा गावात मोकाट कुत्र्यांची दहशत*
*कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन वासरे ठार, तर चार वासरे व एक म्हैस जखमी*
निलंगा :-( प्रतिनिधी/ शिवाजी निरमनाळे)
निलंगा तालुक्यातील मौजे तगरखेडा येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन वासरे ठार तर चार वासरे जखमी व एक म्हैस जखमी झाली आहे.
सविस्तर माहिती अशी की,
गेल्या एक महिन्यापासून तगरखेडा गावालगत असलेल्या शेतात बांधलेल्या जनावरांवर संध्याकाळी अचानक मोकाट कुत्रे हल्ला करत आहेत.त्या हल्ल्यात आजपर्यंत दोन वासरांचा मृत्यू झाला असून चार वासरे व एक म्हैस जखमी झाली आहे. शेतात जनावरे बांधणे धोकादायक ठरत आहे. यात लक्ष्मण डावरगावे व धनुमहाराज गिरी यांच्या वासरांचा मृत्यू झाला तर मुबारक कोतवाल यांचे दोन वासरे , अनिल डावरगावे, विजयकुमार पाटील यांचे प्रत्येकी एक वासरू जखमी,बालाजी गुत्ते यांची म्हैस गंभीर जखमी झाली आहे.
शेतकऱ्यांच्या मनात मोकाट कुत्र्यांची दहशत इतकी वाढली आहे की शेतात जनावरे बांधायची की नाही हा विचार करावा लागत आहे. लहान वासरे गावात घरी बांधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
याविषयी काही शेतकऱ्यांशी चर्चा केली असता असे लक्षात आले की गावात तसेच शिवारात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शेतात मोकाट कुत्रे हरणावर हल्ले करून आपली उपजीविका भागवत होते. त्यांना प्राण्यांच्या मांसाची आवड निर्माण झाल्यामुळे पाळीव जनावरांवर हल्ले करु लागले आहेत. त्यापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्यात बांधणे, लाईट ची व्यवस्था करणे , लहान प्राण्यांना वासरांना गावात घरी बांधणे असे उपाय करावे लागत असल्याचे सांगितले.
------------------------------------------
*शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया*
१) मोकाट कुत्र्यांची संख्या गावात, शिवारात वाढली आहे. मोकाट कुत्र्यांच्या संख्या नियंत्रित करण्यासाठी कुत्र्यांची नशबंदी करावी.
- लक्ष्मण डावरगावे
२) दिवसा वानरा पासून शेतातील कांदे वाचविण्यासाठी शेतात राहावे लागते आणि संध्याकाळी मोकाट कुत्र्यांपासून जनावरे वाचवण्यासाठी परत शेतात राहावे लागत आहे.
- दयानंद निरमनाळे
३) गावालगतच माझं शेत आहे. शनिवारी जनावरे शेतात बांधलो संध्याकाळी अचानक मोकाट कुत्र्यांनी लहान दोन वासरांना हल्ला केला त्यात दोन्ही वासरे जखमी झाले. रात्री शेतात एकट झोपताना भिंती वाटत आहे मोकाट कुत्रे केव्हा माझे झोपेत लचके तोडतील सांगता येत नाही. म्हणून मी शेतात लाईटची सोय केली आहे. फोकस बसविला आहे. मी व माझा मित्र रात्री शेतात राहतो. एकाला दोघे राहिले तर स्वतः चे व जनावरांचे रक्षण करता येईल.
मुबारक कोतवाल
४) प्रशासनाने, ग्रामपंचायत कार्यालयाने, पशुवैद्यकीय विभागाने या गोष्टीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
- विजयकुमार हरंगुळे
-----------------------------------------
अश्या मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांवर वृध्द व्यक्तीवर हल्ले केल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न शेतकरी सामान्य जनतेसमोर उपस्थित करत आहे.



Post a Comment
0 Comments