“शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनाचा समाजातील सर्वसामान्य व्यक्तींना लाभ व्हावा”
प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे
लातूर :-(प्रतिनिधी)
सध्या भारतातील विविध विद्यापीठामार्फत महाविद्यालयीन शिक्षक संशोधन क्षेत्रामध्ये अत्यंत नेत्रदीपक कार्य करीत आहेत. तेव्हा त्यांनी केलेल्या संशोधनाचा समाजातील सर्वसामान्य व्यक्तीला त्याचा लाभ व्हावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांनी केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात जुक्टा संघटना आणि कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकातर्फे दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ.गुणवंत बिरादार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडद्वारा नुकतीच पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली त्यांच्या सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते. यावेळी जुक्टाचे अध्यक्ष प्रा.वाणीएन.व्ही., उपाध्यक्ष प्रा.नयने एम.डी., सचिव प्रा.बीचकाटे टी.एम., सहसचिव प्रा.शास्त्री बी.बी., जिल्हा प्रतिनिधी प्रा.सुरवसे आर.जी.,कोषाध्यक्ष प्रा.सूर्यवंशी के.आर., माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ.कल्याण कांबळे, डॉ.संजय गवई, पर्यवेक्षक प्रा.पवार एस.व्ही., प्रा.पानगावे एस.एस., प्रा.सौ.पाटील व्ही.सी., प्रा.हावळे एस.आर., प्रा.व्ही.जी.स्वामी, प्रा.रवी सोनाने, प्रा. कामाजी पवार, प्रा.वैरागकर मनोज, प्रा.भगवान बिरादार आणि डॉ.अश्विनी रोडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे म्हणाले की, आपल्या महाविद्यालयातील डॉ.गुणवंत बिरादार यांनी परभणी येथील माजी दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एल.एम.करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली “कॉलिटी असेसमेंट अँड प्रीजर्वेशन ऑफ चिवॉन वर्सेस मटन फॉर्म द मार्केट ऑफ मराठवाडा रीजन” या विषयावर संशोधन केले त्याचा फायदा हा मराठवाड्यातील इतर संशोधकांसाठी नक्की होईल असे सांगून अभिनंदन केले
या सत्कार समारंभाला उत्तर देताना डॉ.गुणवंत बिरादार म्हणाले की, आपण शेळी आणि बोकड यांच्या मासामध्ये फरक करतो परंतु माझ्या संशोधना अंती यामध्ये काहीही फरक नाही असे आढळले. यावेळी प्रा.वाणीएन.व्ही., प्रा.बीचकाटे टी.एम., डॉ.कल्याण कांबळे, प्रा.पवार एस.व्ही., प्रा.पानगावे एस.एस., प्रा.सौ.पाटील व्ही.सी., प्रा.व्ही.जी.स्वामी आणि प्रा.डॉ.अश्विनी रोडे यांनी आपापली मनोगते व्यक्त करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रवींद्र सुरवसे यांनी केले तर आभार डॉ.संजय गवई यांनी मानले

Post a Comment
0 Comments