Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*“महात्मा बसवेश्वरमध्ये २९ ऑगस्टला द्वितीय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ”खासदार सुधाकर शृंगारे यांची प्रमुख उपस्थिती*

“महात्मा बसवेश्वरमध्ये २९ ऑगस्टला द्वितीय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ”
खासदार सुधाकर शृंगारे यांची प्रमुख उपस्थिती 
लातूर :-(प्रतिनिधी)
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ ऑगस्ट २०२२ रोजी स.११वा. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये “द्वितीय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ” आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.सांबप्पा गिरवलकर  हे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार सुधाकर शृंगारे, संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर, बिजभाषक म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष आदिनाथ सांगवे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे, विद्यार्थी विकास समिती समन्वयक कॅप्टन प्रा.डॅा.बाळासाहेब गोडबोले आणि परीक्षा विभाग प्रमुख डॉ.शिवप्रसाद डोंगरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाची रूपरेषा आणि निमंत्रण पत्र नुकतेच खासदार सुधाकर शृंगारे यांना देण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे, परीक्षा प्रमुख डॉ.शिवप्रसाद डोंगरे, आझादीका अमृत महोत्सव समितीचे समन्वयक डॉ.श्रीकांत गायकवाड, समाजकार्य विभाग प्रमुख डॉ.दिनेश मौने आणि रासेयो कार्यक्रमाधिकारी डॅा.संजय गवई यांची उपस्थिती होती.    
या कार्यक्रमामध्ये उपरणासह प्रभात फेरी, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्याना पदवी प्रमाणपत्र वितरण व मान्यवरांचे मार्गदर्शन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी निमंत्रण पत्रिका व स्वागत समिती, स्वागत गीत समिती सूत्रसंचालन समिती, प्रसिद्धी व बॅनर निर्मिती समिती, स्टेज डेकोरेशन समिती, भोजन व वितरण समिती, पानी वितरण समिती, बैठक व्यवस्था समिती, विद्यार्थी नाव नोंदणी समिती, प्रभात फेरी समिती, स्वच्छता समिती आणि महिला अप्रोन समिती गठीत करण्यात आली असून या समितीतील सर्व सहभागी प्राध्यापक या कार्यक्रमामध्ये परिश्रम घेत आहे.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील पदवी (कला, वाणिज्य, विज्ञान व समाजकार्य) आणि पदव्युत्तर (राज्यशास्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, भूगोल आणि गणित) या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ.शिवप्रसाद डोंगरे, विद्यार्थी विकास समिती समन्वयक कॅप्टन डॅा.बाळासाहेब गोडबोले, आझादीका अमृत महोत्सव समितीचे समन्वयक डॉ.श्रीकांत गायकवाड, क्रीडा विभाग प्रमुख डॅा.भास्कर नल्ला रेड्डी, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॅा.रत्नाकर बेडगे, डॉ.संजय गवई, डॅा.टी.घन:श्याम व प्रा.आशिष क्षिरसागर आदींनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments