*धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्त ह.भ.प.बालाजी महाराज बोराडे यांच्या शिवकीर्तनाचे आयोजन*
शिवजन्मोत्सव समितीचा स्तुत्य उपक्रम
निलंगा :-( प्रतिनिधी)
निलंगा तालुक्यातील मौजे तगरखेडा येथे शिवजन्मोत्सव समिती व तगरखेडा ग्रामस्थांमार्फत छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्त दिनांक 15 मे रोजी संध्याकाळी साडे आठ वाजता तगरखेडा येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते कीर्तनकार झी टॉकीज फेम ह.भ.प बालाजी महाराज बोराडे यांच्या शिव कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी समितीच्या सदस्यांनी वैयक्तिक आर्थिक खर्च करुन पुढाकार घेऊन हा भव्य किर्तन सोहळा आयोजित केला आहे.
शिवजन्मोत्सव समितीचे स्तुत्य उपक्रम-
गावातील तरुण पिढीला एकत्र करून गावाच्या विकासासाठी, वैचारिक पातळी वाढविण्यासाठी, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याच्या दृष्टीने, तरुण पिढीमध्ये सामाजिक बांधिलकी, सामाजिक उपक्रमांची आवड निर्माण करण्याचे कार्य समिती मार्फत केले जातात. तगरखेडा गावामध्ये "ना भुतो ना भविष्यती" असा शिवजन्मोत्सव या समितीमार्फत साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सव समितीमार्फत वाढदिवसाच्या निमित्ताने होतकरू गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे संकलन करणे चालू आहे.
तरुण पिढी वाढदिवसाला केक, फटाकेअसाअनावश्यक खर्च करतो तो अनावश्यक खर्च टाळून त्याऐवजी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्यावे ही संकल्पना मांडली. या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. समिती स्थापन होऊन तीन महिने झाले आजपर्यंत 1560वह्या, 960 पेन , 350 शिसपेन्सिल, 130 इंग्रजी शब्दार्थ रीडर , 100 उजळणीचे पुस्तके, 9 शुध्द पिण्याच्या पाण्याचे जार इ. शैक्षणिक साहित्याचे संकलन करण्यात आले. शैक्षणिक साहित्याचे जून महिन्यात जिल्हा परिषद शाळेत, समता महाविद्यालयात वाटप होणार आहे. तरुण पिढीमध्ये सामाजिक बांधिलकी, सामाजिक दृष्टीकोन निर्माण करण्यात मोलाचे योगदान शिवजन्मोत्सव समितीचे आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्याचा हा प्रथम वर्ष आहे. या प्रथम वर्षी जन्मोत्सव सोहळा निमित्त भव्य मिरवणुक काढणे, डिजे लावणे, नृत्य करणे अश्या उपक्रमाला फाटा देत वैचारिक पातळी वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ह.भ.प बालाजी महाराज बोराडे यांच्या शिवकीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गावातील लहान थोर मंडळीना किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती ,वैचारिक पातळी वाढविण्याचे कार्य ही समिती करत आहे. पुढील जन्मोत्सव सोहळ्यात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातील. नागरिकांची आरोग्य तपासणी ,रक्तदान शिबिर ,शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृक्षारोपण असे वेगवेगळे उपक्रम समितीमार्फत राबवले जाणार आहेत.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्त ह.भ.प.बालाजी महाराज बोराडे यांच्या शिव कीर्तनातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे संघर्षमय जीवनप्रवासाचा उलगडा करण्यात येणार आहे तरी शिवजन्मोत्सव समितीमार्फत व तगरखेडा ग्रामस्थांमार्फत या भव्य किर्तन सोहळ्याचा निलंगा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.


Post a Comment
0 Comments