*ज्युनिअर आयएएस शालेय स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ*
लातूर:- (प्रतिनिधी)
वर्ष 2013 पासून प्राथमिक स्तरापासून भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारीची सुरुवात व्हावी म्हणून ज्युनिअर आयएएस काॅमिटेशन या शालेय स्पर्धा परीक्षा चे मराठी,सेमी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यासाठी दर वर्षी आयोजन केले जाते.महाराष्ट्रातील 22 -23 जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प कार्यरत आहे.
संस्कार ज्युनिअर आयएएस काॅमिटेशन 2019-20 या शालेय स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ रविवारी दिनांक 8 मे रोजी सकाळी 10 वाजता दयानंद सांस्कृतीक सभागृह, दयानंद काॅलेज बार्शी रोड लातूर येथे होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार तर प्रमुख पाहुणे डॉ.महादेव गव्हाणे प्राचार्य राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर, सुधाकर तेलंग सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभाग लातूर. यांच्या शुभहस्ते गुणवंतांचा गुणगौरव करण्यात येणार आहे .
या स्पर्धा परीक्षेचे मिशन्न आहे...' सामाजिक बांधिलकी जपणारे, आष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे, आयएएस,आयपीएस, आयआयटी, महाराष्ट्रातील प्रशासन सेवेतील अधिकारी घडावण्याच.'
कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या पण असामान्य गुणवत्ता व उत्तुंग प्रतिमा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील आयएएस,आयपीएस, आय आय टी यांसारख्या स्पर्धापरीक्षांची प्राथमिक पुर्व तयारी शालेयस्तरापासून या सामाजिक जाणीवेने इयत्ता तिसरी, चौथी,पाचवी,सहावी, सातवी, आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सलग आठव्या वर्षी राज्यस्तरावर फेब्रुवारी 2020 रोजी ज्युनिअर आयएएस काॅम्पिटेशन या स्पर्धा परीक्षेचे सर्वांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी आयोजन करुन शकलो.या परीक्षेतील राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आलेल्या गुणवंतांचा मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला आहे.या गुणगौरव समारंभाला सर्वांना उपस्थित रहावे अशी विनंती मानव्य विद्याशाखेचे सदस्य,संस्कार प्रकाशनचे संचालक ओमप्रकाश जाधव यांनी केले आहे.



Post a Comment
0 Comments