*अमृत बसवदे यांना मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर*
निलंगा :-( प्रतिनिधी)
निलंगा तालुक्यातील मौजे हलगरा गावचे उपसरपंच अमृत बसवदे यांनी कोविड काळात गावात उत्कृष्ट व नियोजनबद्ध काम करुन गाव, तालुका,जिल्हासह संपुर्ण मराठवाडाभर आपल्या कार्याचा ठसा उमटवल्या बद्दल शिवसृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात सरपंच म्हणून मागील दोन वर्षातील त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व सर्वांनी त्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा अशा स्वरूपाची होती कोरोना काळात जीवाचं रान करून गावाच्या भवितव्याचा विचार करत प्रसंगी गावकऱ्यांच्या रोषाचा सामना देखील केला.परंतु न डगमगता आलेल्या संकटांना निधड्या छातीने सामोरे गेल्यात ही बाब अत्यंत प्रशंसनीय आहे कोरोना काळात केलेले काम इतरांना देखील प्रेरणादायी ठरणारे आहे त्यामुळेच शिवशृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरव करत आहोत असे शिवसृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव प्रा.सहदेव मोरे पाटील यांनी सांगितले.
गावातील जी मंडळी शहरात जातात किंवा लोकांच्या संपर्कातील विविध व्यवसायात असतात त्यांच्यावर आवश्यकतेनुसार रॅपिड ॲटिजेन टेस्ट करणे ,गावातील पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेणे, गावात घरोघरी जाऊन आशाताईच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला गावकऱ्यांची तपासणी करून त्याची ऑक्सिजन लेवल, तापमान चेक करणे, प्रत्येक कुटुंबाला विटामिन गोळ्या, सॅनिटायझर ,साबण उपलब्ध करून देणे, बाहेर गावातून आलेल्या गावातील आणि गावाबाहेरील व्यक्तींना सक्तीने तीन दिवस क्वारनटाइन करून या माध्यमातून कोरोनाची चैन ब्रेक करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी गावकऱ्यांचा रोष घेणे, सगळ्या मोहिमेत गरजेनुसार गावासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करणे ,कोरोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार लसीकरण, कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर गाव कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न केला.
अनेकांनी हजारो लोकांना जेवण दिले अनेकांनी धान्यांचे किट वाटप केले गोरगरिबांना कपडे वाटप केले. ज्यावेळी सर्वांनी घरात बसून राहावे अशी परिस्थिती होती त्यावेळी आपण गावात पालकांच्या भूमिकेतून गावभर फिरून कोरोनाला आळा कसा घालता येईल यासाठी सर्वतोपरी हलगरा गावचे उपसरपंच अमृत बसवदे यांनी प्रयत्न केले आहेत.
अमृत बसवदे यांच्या कोविड महामारीच्या काळात केलेल्या वरील सर्व गोष्टींचा विचार करून त्यांना शिवसृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला.
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे भाजपा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे , हलगरा ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



Post a Comment
0 Comments