*शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी घेतली आलमला ग्रामस्थांची भेट*
लातूर:-(प्रतिनिधी)
औसा तालुक्यातील आलमला या गावी जाऊन गावातील ज्येष्ठ शिवसैनिक पदाधिकारी युवा सैनिक यांची भेट घेतली व ग्रामस्थांशी चर्चा केली .
गावातील विविध समस्यावर गावातील जेष्ठ नागरिक तरुण पिढी यांनी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या सोबत चर्चा केली. याप्रसंगी जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी विविध खात्याअंतर्गत असणारे प्रश्न सोडवण्यासाठी या प्रश्नाला वाचा होण्यासाठी शिवसेना शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मी सदैव तुमच्या सोबत राहील असा शब्द दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी शरद कदम यांच्या घरी जाऊन त्यांचे विचारपूस केले शरद कदम यांचा काही दिवसापूर्वी अपघात झालेला होता म्हणून जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांची कुटुंबाची भेट घेतली. तसेच यावेळी गावातील बरेचसे तरुण शिवसेनेमध्ये सहभागी होणार असे चित्र आहे.
याप्रसंगी औसा तालुका उपप्रमुख श्रीमान सहदेव कोळपे. दुसरे उपतालुकाप्रमुख श्रीराम कुलकर्णी, राजाभाऊ लाटे, युवराज वंजारे, हिरालाल साबळे, महेश चांदणे ,रवी गायकवाड ,तसेच आलमला येथील ज्येष्ठ शिवसैनिक वीरभद्र बिरोळे भागवत चित्ते, सुदर्शन राजुरे, राजाभाऊ, ,सिद्धेश्वर धाराशिवे ,तुकाराम पाटील, कृष्णा पाटील, बाळू कुंभार, मोहन गिरी ,आकाश आडे यश पाटील राहुल आडे, अभिषेक कदम बरेचसे शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments