Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*लातूर जिल्हा रोटरी कॉपच्या अध्यक्षपदी डॉ.मायाताई कुलकर्णी तर सचिवपदी डॉ.गुणवंत बिरादार याची निवड*

लातूर जिल्हा रोटरी कॉपच्या अध्यक्षपदी डॉ.मायाताई कुलकर्णी तर सचिवपदी डॉ.गुणवंत बिरादार याची निवड
लातूर :-(प्रतिनिधी)
रोटरी एक आंतरराष्ट्रीय संस्था असून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ मध्ये एकूण ९० रोटरी क्लब असून लातूर जिल्ह्यामध्ये एकूण १० क्लब आहेत. यासर्व क्लबद्वारे समाजातील गरजू आणि गरीब लोकांच्या कल्याणासाठी सातत्याने समाजपयोगी कार्य केले जाते. रोटरी क्लबचे महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत रोटरीमध्ये नेतृत्वाची फक्त एक वर्षच संधी असते. या एका वर्षामध्ये सर्व पदाधिकारी आपल्या कार्यकुशलतेने काम करतात.
लातूर जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबमध्ये समन्वय निर्माण व्हावा आणि संपूर्ण जिल्ह्यात रोटरीद्वारे विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविले जावे या दृष्टिकोनातून लातूर जिल्हा रोटरी कॉपची निर्मितीमध्ये  रोटरीचे माजी व आजी प्रांतपाल, सहाय्यक प्रांतपाल, अध्यक्ष, सचिव करीत असतात.  
लातूर जिल्हा रोटरी कॉपच्या अध्यक्षपदी डॉ.मायाताई कुलकर्णी आणि सचिवपदी डॉ.गुणवंत बिरादार यांची नुकतीच भालचंद्र ब्लड बँक सभागृहामध्ये निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार माजी अध्यक्ष शशिकांत चलवाड आणि सचीव महेंद्र दुरुगकर यांच्या हस्ते करण्यात आला.  
त्यांच्या झालेल्या या निवडीबद्दल रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ.हरिप्रसाद सोमानी, डॉ.विजयभाऊ राठी, डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे, शशिकांत मोरलावार, लक्ष्मीकांत सोनी, मेघराज बरबडे, राजगोपाल तापडिया, डॉ. बोरगावकर, रवी जोशी, सतीश दिवाण, अनिल चवळे, डॉ.अनुप देवणीकर, हेमंत रामढवे, उमाकांत मद्रेवार, डॉ. सूचित्रा भालचंद्र, डॉ.विनोद लड्डा, संजय बोरा, डॉ.संजय गवई, नीलकंठ स्वामी, महादेव पांडे आदिनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments