नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शून्य मशागत तंत्रज्ञान अभ्यास दौरा...
उदगीर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम..
उदगीर / प्रतिनिधी : हवामान बदलामुळे शेती व्यवसायात अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.या परिस्थितीत शेतीसाठी शेतकऱ्यांना योग्य तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याची काळाची गरज आहे. यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत अभ्यास दौऱ्याचे नियोजन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय उदगीर यांच्यातर्फे करण्यात आले होते.
वेळी शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. काळाची गरज पाहता विद्यापीठाने प्रसारित केलेल्या नवीन तंत्रज्ञान व वाण विकसित करीत आसतात याची शेतकऱ्यांना माहिती व्हावी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन या संदर्भात विद्यापीठाला भेट, तसेच शून्य मशागत केलेल्या प्रत्यक्ष प्लॉट ला व्हिजिट, बीबीएफ प्लॉट व्हिजिट, शेतकऱ्यांना त्यांची ओळख होण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवशीय अभ्यास दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख ओळख करून देण्यात आली. अभ्यास दौरा आयोजित केला आहे. श्रीमती सावंत.एस. एस. लेखा अधिकारी, श्री सुदर्शन बोराडे तंत्रज्ञान समन्वयक, श्री हाळी घोंगडे. ए. एस. कृषी सहाय्यक, घोडके व्ही एस प्रकल्प लेखा सहाय्यक,श्री बडवने एस, जाधव एस, कदम एस पी प्रकल्पातील समुह साहयक उपस्थित होते. प्रकल्प गावातील शेतकऱ्यांनी अभ्यास दौऱ्याचा लाभ घेतला आहे.

Post a Comment
0 Comments