औराद ग्रामीण रुग्णालय नावाला , प्राथमिक आरोग्य केंद्र लागले कामाला..
डॉ. पोतदार यांनी पदभार घेताच येथील बंद असलेली भोजन व्यवस्था तात्काळ सुरु केली आणी चांगली सेवाशिस्त लावल्याने बाह्यरुग्ण संख्येत सुध्दा झपाट्याने वाढलेली दिसुन येत असल्यामुळे डॉ. पोतदार यांचे ग्रामस्थांमधुन कौतुक होत आहे.
औराद शहाजानी (प्रतिनिधी)
सहा वर्षांपूर्वी येथील आरोग्य सेवेची गरज आणी औराद गावाचा दर्जा पाहुन तत्कालीन माजी मुख्यमंत्री तथा आमदार स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे ग्रामीण रुग्णालय मंजुर करुन गावातील लोकांना लवकरच चांगल्या आरोग्याच्या सुविधा गावपातळीवर मिळण्यासाठी मोठे योगदान देत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजुर केला आणी प्रत्यक्ष इमारतीचे बांधकामाचे उद्घाटनही केले होते.
मागील पाच वर्षापूर्वी निधी मंजुर झाला आणी इमारत बांधकाम सुरु होऊन आज रोजी जवळपास ९०% काम पुर्णही झालेले आसतानाही माजी पालकमंत्री तथा औराद गावचे रहीवासी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सर्व कांही आवाक्यात आसतानाही का कुणास ठाऊक येथे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात ते सुद्धा अपयशी ठरले आणी अश्यातच कोरोनाची पहिली , दुसरी लाट आली आणी पुन्हा औरादसह परीसरातील अनेक नागरीकांना येथील ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यासाठी मागणी वाढली तेव्हा आहे त्या इमारतीमी ग्रामपंचायत चा कांही निधी आणी जि.प.व आमदार फंड वापरुन कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येथील रहिवासी आमदारांना यश आले आणि येथे पंन्नास खाटाही मंजुर करण्यात आलेल्या होत्या आणी त्याचे उद्घाटनही मोठ्या उत्साहात करण्यात आले होते पण थोड्याच कालावधीत औराद येथील ग्रामीण रुग्णालयाला मिळालेले साहित्य व 50 खाटा ही उदगीर येथे रुग्णालयाकडे वळविण्यात आल्या त्यामुळे पुन्हा औरादकरांच्या नशिबीला आरोग्य सुविधांचा अभावच आला.
जवळपास दीड वर्षांपूर्वीपासून इमारत बांधकाम करून तयार आहे आणि धूळ खात पडलेली आहे. या इमारतीच्या बाजुलाच महावितरणच्या रोहीत्र बाजुला करण्यासाठी निधी व वरीष्ठांचे आदेश आसतानाही आजही रोहीत्र धोकादायक पध्दतीने या इमारतीच्या समोरच्या बाजुला जश्याच्या तश्या उभ्या आसल्यामुळे तारांचा धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणी अशी परिस्थिती औरादमधील विविध पक्षांच्या नेत्यांना व आरोग्य विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिसून येत असतानाही याकडे उघड कानाडोळा होत असल्यामुळे येथील लहान थोर वयोवृद्ध लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्यामुळे मोठे आरोग्य संकट घोंगावत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील चार महिन्यांपूर्वी रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोतदार रुजू झाले आणि लगेच त्यांच्याकडे पुर्वीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव कांबळे यांनी तात्काळ पदभारही सोपविला त्यानंतर त्यांनी दोन वैद्यकीय अधिकारी व दहा कर्मचारी यांना सोबत त्यांना एका वर्षामध्ये जेवढे उद्देश देण्यात आलेले होते तेवढे उद्देश त्यांनी तीन महिन्यांत पुर्ण केल्यामुळेच डॉ. पोतदार यांचा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आलेला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात पुर्वी फक्त दिवसभरात बाह्यरुग्ण तपासणी नोंदणी फक्त २० ते २५ व्हायची पण आता डॉ. पोतदार येथे रुजु झाल्यापासून दररोज जवळपास १०० ते १३० नोंद होत आहेत व उपचारासाठी दररोज चार ते पाच रुग्ण दाखल करण्यात येत आहेत. शिवाय येथे माता प्रसुतीच्या प्रमाणात तर चांगली वाढ झाली आणी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी साहित्य सुविधा उपलब्ध नसतानाही हलगरा येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेऊन येथील बंद असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या खालच्या इमारतीमध्ये त्या शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना व बाळांना पुढील उपचार करत या मातांना दोन वेळा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दिला जाणारा सकस आहार सुरु करण्यात आला जो गेल्या पंधरा वर्षात कधीच पहायला तर सोडा ऐकवयासही मिळत नव्हता.
तसेच डॉ. पोतदार हे स्वतः दिवसभर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे थांबून येथे येणाऱ्या लहान ते वयोवृद्ध महिला व पुरुषांना आरोग्य सुविधा चांगल्या प्रमाणे देत आहेत शिवाय येथे आजतागायत कधीच शुगर व बिपी चे इंजेक्शन व गोळ्या मिळत नव्हत्या पण ते येताच सर्व सुविधा मिळवून देत आसल्यामुळे येथे ग्रामीण रुग्णालय नावाला आणी प्राथमिक आरोग्य केंद्र कामाला म्हणत गावकरी चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्यामुळे डॉ. पोतदार यांचे कौतुक करत आहेत.
येथे ग्रामीण रुग्णालय बंद असतानाही दोन वैद्यकीय अधिकारी व एक ब्रदर येथे आरोग्य सुविधा देण्यासाठी येत आहेत अशी चर्चा आहे पण ते किती वेळ येथे असतात व किती दिवस येथे असतात याची नोंद मात्र या ग्रामीण रुग्णालयात दिसून येत नाही आणी यांना वरीष्ठांचे अभय आसल्यामुळे असे डॉ. व वैद्यकीय अधिकारी हे मनमानी करत स्वतः चे व्यावसाय करत आसल्याची चर्चा नागरिकांमधून वर्तवली जात आहे त्यामध्ये एक एम डी डॉक्टर लातूर उपसंचालक आरोग्य विभाग यांचे निकटवर्तीय नातेवाईक, पाहुणे आसल्याचे बोलत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने लवकरच ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात यावे अन्यथा आम्ही औरादकर हे आमच्या पध्दतीने आंदोलन करण्यात येईल आसा इशारा वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रशासनाला येथील गावकरी यांचे वतीने देण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments