*युवासेना जिल्हा सरचिटणीस विनोद कंदमुळे यांच्या प्रयत्नांना यश !*
*लातूर ते खंडापूर सिटी बससेवेला मंजुरी !*
लातूर :-(प्रतिनिधी)
तालुक्यातील खंडापूर ते लातूर ही सिटी बस सेवेची संकल्पना युवासेना लातूर जिल्हा सरचिटणीस विनोद कंदमुळे यांनी महिन्यांपूर्वी मनपा आयुक्त श्री.अमन मित्तल यांच्याजवळ खंडापूर ग्रामपंचायतीचा ठराव जमा करून ग्रामस्थांच्या व विध्यार्थ्यांना याची गरज असल्याचे आयुक्तांना पटवून दिले. त्यावेळेस मनपा आयुक्तांनी आम्ही एसटी प्रशासनाकडून नाहरकत मिळताच यासंदर्भात चाचणी करण्याबाबत येईल असे सांगितले होते,आता त्याला मंजुरी मिळाली असून त्याची चाचणी सुद्धा झाली आहे अशी माहिती लातूर मनपा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे अशी माहिती युवासेनेचे लातूर जिल्हा सरचिटणीस विनोद कंदमुळे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.

Post a Comment
0 Comments