Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर द्वारा राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न*

५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर द्वारा राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न

लातूर:-(प्रतिनिधी)
५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरच्यावतीने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील एनसीसी कॅडेटचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर (एटीसी २२५) शासकीय मुला-मुलींचे वसतिगृह, खंडापूर, सी.आर.पी.एफ.कॅम्प जवळ, लातूर येथे दि.२८ ऑक्टोबर ते ०४ नोव्हेबर २०२२ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. 
आज संपूर्ण भारतात पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्त साधून राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून एनसीसी कॅडेट्स, जेसीओ आणि पीआय स्टाफ यांनी एकता राष्ट्रीय एकता दौडमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. या दौडमध्ये १८  कॉलेज व २८ शाळांची एकूण ४५० एनसीसी कॅडेड्स सहभागी झाले होते. 
यावेळी दौडमध्ये कॅम्प कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल संतोषकुमार यांनी राष्ट्रीय एकता व अखंडता हा नारा घेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नांची पूर्तता करण्याची शपथ देऊन सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. 




या दौडमध्ये काळे मुकुंद घन:श्याम, एम.यु.कॉलेज, उदगीर, चणे आबा आकाश, शिवाजी कॉलेज, उमरगा आणि धर्मशाळे प्रशांत, ए.एस.सी, कॉलेज, नळदुर्ग यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी सिनिअर ए.एन.ओ.कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, सुभेदार दामोदर दिलीप, सुबेदार शेखर थोरात, सुबेदार भोपालसिंग, नायब सुभेदार विष्णु कच्छवे, नायब सुभेदार शेंडगे दिलीप, बि.एच.एम. सुखविंदर पारा, प्रा.डॉ.संजय गवई, योगेश दळवी, हवालदार चित्रपाल सिंग, विपिन पाल, हरेंदर अजमेर, हरित्रायदा, दादा मूठे, पंकज बावीस्कर, ललित, अशोक काड्रेल, योगेश बारसे, दलविंदर सोहन, देवराज बिरवळ, हेड क्लर्क घोगरे बी.व्ही. आदींचे सहकार्य मिळत आहे.

Post a Comment

0 Comments