पू.भिक्खू पय्यानंद थेरो
लातूर :-(प्रतिनिधी)
बुद्ध धम्माच्या विचाराची खऱ्या अर्थाने समाजामध्ये पेरणी करावयाची असेल तर बुद्ध विहारात येऊन धम्म विचाराचे चिंतन करणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी लॉर्ड बुद्ध विहाराला सढळ हाताने बौद्ध समाजातील सर्वानी सहकार्य करावे असे प्रतिपादन बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव तथा धम्मगुरु पू.भिक्खू पय्यानंद थेरो यांनी केले
विशाखा चॅरिटेबल ट्रस्ट, विकास नगर, लातूर द्वारा आयोजित वर्षावास समापन व धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते धम्मदेसना देताना बोलत होते.
यावेळी विचार मंचावर पू.भिक्खू नागसेन बोधी (खरोसा), पू.भिक्खू बोधेशील, पू.भिक्खू इंदवस, बसवंतप्पा उबाळे, सुजाता अजनीकर, प्रसिद्ध गायक दत्ता शिंदे, ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी, राजकुमार बनसोडे, एम.एन.गायकवाड, मनीष कावळे (नांदेड), डॉ.संजय गवई, प्रा.अनिल कांबळे, आणि बी.पी.सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानवांना पुष्प आणि धुपाने अभिवादन करण्यात आले आणि त्रीशरण पंचशील करण्यात घेण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना पू.भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले की, आज प्रत्येकाने आपल्या मनाला विचाराची प्रेरणा देणे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रेरणा वाचन आणि चिंतनातून मिळते त्यामुळे आपण बुद्धाचा धम्म समजून घेऊन शिलाचा मार्ग अवलंबिला पाहिजे असे ते म्हणाले
यावेळी धम्मदेशना देताना पू.भिक्खू नागसेन बोधी मनाने की, बुद्ध धम्माला ग्रहण करण्यामध्ये उपासक-उपासिकांमध्ये गंभीरता येणे आवश्यक आहे. बुद्धाने दिलेल्या तीन गोष्टीचा विचार करून आपण आपले जीवन हे समृद्ध केले पाहिजे यामध्ये एकांतात राहने, ध्यान करणे आणि मौन बाळगणे याविषयी उदाहरणाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी पू.भिक्खू बोधीशील यांनीही उपस्थिटन बहुमोल मार्गदर्शना सोबतच मनीष कावळे, रामराव गवळी, बसवंतप्पा उबाळे, मधुकर गायकवाड, डॉ.संजय गवई आणि सुजाता अजनीकर यांनी आपली मनोगते व्यक्त करून लॉर्ड बुद्ध विहाराला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शोभाताई सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रा.शितल पारवे (ससाने) यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाखा चॅरिटेबल ट्रस्ट मधील पदाधिकारी शोभा कांबळे, निर्मला मधाळे, दैवशाला कांबळे, निर्मला गौरकर, रेखा गायकवाड (शिखरे), छायाताई उबाळे, सिंधुताई बनसोडे, करूणा कांबळे, शकुंतला गायकवाड, बबीताताई सूर्यवंशी, आम्रपाली कांबळे, रेखा कांबळे, विमल गंडले, विद्या गवई आणि महिला मंडळातील प्रज्ञा लांडगे, स्मिता गिल्वे, पंचशीला चौदते, ज्योती गायकवाड, निर्गुणा गोडबोले, आशा धावारे, सुकुमार कांबळे, तोळाबाई माने, दिगंबर ढोणे, निर्मला बादाडे, प्रकाश कांबळे, सुधाकर कांबळे, अर्जुन कांबळे, आनंद डोणराव, बी.एम.कांबळे, अनुरुद्ध बनसोडे, के.ओ.गवई, समाधान कांबळे, बाबुराव गायकवाड आणि बालाजी धायगुडे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments