लातूर :-(प्रतिनिधी)
येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील इतिहास पदव्यूत्तर द्वितीय वर्षातील विद्यार्थी शुभम मधुकर निकम यांनी विविध वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेमध्ये उज्ज्वल यश संपादित केल्यामुळे प्राचार्य दालनामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक प्रा.जि.एम.धाराशिवे, स्वीकृत संचालक अशोक शरणाप्पा उपासे, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, इतिहास विभाग प्रमुख तथा स्पर्धा समिती समन्वयक डॉ.सदाशिव दंदे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.विजयकुमार सोनी, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.संजय गवई आणि डॉ.किरण ओटले यांची उपस्थिती होती.
शुभम मधुकर निकम यांनी युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय, भारत सरकार, नेहरू युवा केंद्र, लातूर आणि राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा उत्सव २०२२ अंतर्गत आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. तसेच र.भ.अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय गेवराई जि.बीड द्वारा आयोजित शिक्षण महर्षी शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त अट्टल महाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२२ मध्ये त्यांनी सहभाग नोंदवून उज्वल यश संपादित केले आणि जनविकास महाविद्यालय, बनसारोळा ता.केज जि.बीड पूज्य मनोहरराव गोरे (अण्णा) मराठवाडास्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
यामध्ये त्यांनी स्मृतिचिन्ह, रोख रक्कम आणि सन्मानपत्र मिळविले आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या या उज्वल यशाबद्दल श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपप्राचार्य, शाखा समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments