Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*सध्याचे युग स्पर्धेचे नसून माहिती संकलन आणि सादरीकरणाचे आहे-डॉ.संजय गवई*

सध्याचे युग स्पर्धेचे नसून माहिती संकलन आणि सादरीकरणाचे आहे-डॉ.संजय गवई 
लातूर :-(प्रतिनिधी) 
सध्याचे युग हे स्पर्धेचे नसून ते माहिती संकलन आणि सादरीकरणाचे आहे असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.संजय गवई यांनी बोलताना व्यक्त केले. 
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सहकार्याने पुणे येथे तीन दिवसीय “रोल ऑफ मीडिया इन सोशल वेल्फेअर” या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात समारोप प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.संजय गवई बोलत होते. यावेळी विचारमंचावर संचालक एस.चोकालिंगम, सत्र संचालक डॉ.बबन जोगदंड आणि संजीवनी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.  
पुढे बोलतांना डॉ.संजय गवई म्हणाले की, आज प्रशासनात अनेक नवनवीन बदल घडून येत आहेत याची माहिती होणे अत्यावश्यक आहे त्यासाठी प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असते. या तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये ई.झेड.खोब्रागडे, डॉ.बबन जोगदंड, डॉ.वि.ल.धारूरकर, डॉ.संतोष बोराडे, अशोक देशमुख, अपर्णा चव्हाण, डॉ.सीमा निकम, डॉ.जयश्री फडणविस, विनायक पाचगल, संदीप गादिया आदिनी विविध विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले तर गटचर्चा डॉ.राजकुमार दासरवाड व सर्व प्रशिक्षणार्थी यांच्या सहकार्याने संपन्न झाली. यामध्ये ११४ नवनवीन बाबींची माहिती प्रशिक्षणार्थ्यांना मिळाली. यामध्ये अंधानुकरण, अनुकरण आणि अनुसरण संकल्पना, सामाजिक न्याय संकल्पना, वक्तृत्व, लेखन आणि निरीक्षण कौशल्य, परस्पर संवाद, माहितीचे संकलन, दस्ताऐवजीकरण, संप्रेषण, सायबर गुन्हेगारी, आनंदी जीवन आदी विविध बाबींची तज्ञांकडून चर्चात्मक स्वरूपामध्ये सकारात्मक पद्धतीने माहिती मिळाली. असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. संजय गवई यांचे उत्कृष्ठ आणि सक्रिय सहभागाबद्दल संचालक एस.चोकालिंगम आणि सत्र संचालक डॉ.बबन जोगदंड यांनी विशेष अभिनंदनही केले.     
या प्रशिक्षणाला महाराष्ट्रातील समाजकार्य महाविद्यालयातून प्राचार्य, प्राध्यापक आणि स्वयंसेवी संस्थेतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Post a Comment

0 Comments