कॅम्प कमांडर लेफ्टनंट कर्नल संतोषकुमार
एनसीसी कॅडेटचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर (एटीसी २२५) प्रारंभ
लातूर :-(प्रतिनिधी)
शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना देशसेवा आणि स्व-संरक्षणाचे शिक्षण मिळावे या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेमध्ये एन.सी.सी युनिटची निर्मिती केली जाते त्यामुळे एन.सी.सी कॅडेट्सनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन कॅम्प कमांडर लेफ्टनंट कर्नल संतोषकुमार
यांनी केले.
५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरच्यावतीने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील एनसीसी कॅडेटचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर (एटीसी २२५) शासकीय मुला-मुलींचे वसतिगृह, खंडापूर, सी.आर.पी.एफ.कॅम्प जवळ, लातूर येथे दि.२८ ऑक्टोबर ते ०४ नोव्हेबर २०२२ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावार सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सीनियर ए.एन.ओ.कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले आणि सुभेदार दामोदर दिलीप यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूर तर्फे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले.
पुढे बोलताना कमांडर लेफ्टनंट कर्नल संतोषकुमार म्हणाले की, एनसीसी कॅडेट्सनी कॅम्पमध्ये तन्मयतेने आणि तत्परतेने सहभागी व्हावे. तसेच त्यांनी कॅम्पमधील ड्रिल, पी.टी. परेड, फायरिंग, नकाशा वाचन, समाजसेवा आदि सर्व उपक्रमामध्ये भाग घ्यावा असे सांगून अग्निपथ योजनेची सविस्तर माहिती दिली. तसेच जे एनसीसी कॅडेट्स शिबिर पूर्ण करून ए.बी.सी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना अनुक्रमे ५,१०,१५ गुण मिळणार आहे. सध्या महाराष्ट्र शासनाने एनसीसीसाठी ५ टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे.
यावेळी बोलताना प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार म्हणाले की, एनसीसी कॅडेट्सनी देशसेवेसोबतच समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता अभियानात सुद्धा सहभागी व्हावे असेही ते म्हणाले.
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी सुबेदार शेखर थोरात, सुबेदार भोपालसिंग, नायब सुभेदार विष्णु कच्छवे, नायब सुभेदार शेंडगे दिलीप, बि.एच.एम. सुखविंदर पारा, प्रा.डॉ.संजय गवई, हवालदार चित्रपाल सिंग, विपिन पाल, हरेंदर अजमेर, हरित्रायदा, दादा मूठे, पंकज बावीस्कर, ललित, अशोक काड्रेल, योगेश बारसे, दलविंदर सोहन, देवराज बिरवळ, हेड क्लर्क घोगरे बी.व्ही. आदींचे सहकार्य मिळत आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सीनियर ए.एन.ओ.कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता एनसीसी गीत आणि राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment
0 Comments