लातूर:-(प्रतिनिधी)
वरोरा जि. चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील तीन खेळाडूंचा सहभाग होता. यात कुमारी शिल्पा सूर्यवंशी बीए प्रथम वर्ष शिंदे राधा बी ए प्रथम वर्ष, शिंदे रेणुका बीकॉम प्रथम वर्ष वरील स्पर्धेत या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. खेळाडूंच्या या यशाबद्दल शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बसवराज वलांडे संस्थेचे सचिव रमेशराव बगदुरे, संचालक दगडू गिरबने, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रदीप पाटील, प्राध्यापक रवी अंबुलगे, यांनी अभिनंदन केले. या खेळाडूंना महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक तथा महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे विभागीय सचिव प्रा. हंडे विजयकुमार प्रा. मुस्ताक रकसाले विभागीय मार्गदर्शक दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विविध खेळातील खेळाडूंनी अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment
0 Comments