Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*मेजर सूर्यकांत शेटगार हे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित*


*मेजर सूर्यकांत शेटगार हे राष्ट्रीय समाजभूषण 
पुरस्काराने सन्मानित* 

लातूर:-(प्रतिनिधी)  काव्यमित्र पुणे या संस्थेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महामहीम राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने व मदर इंडिया पुरस्कृत शामलादेवी अब्रोल यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून प्रबोधनांची दिवाळी अंकाचा भव्य प्रकाशन सोहळा व राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार, राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार, राष्ट्रीय आदर्श महिला समाज भूषण पुरस्कार आणि परिवर्तनवादी कवितांच्या मेजवानीसह हा कार्यक्रम आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी पुणे या ठिकाणी संपन्न झाला.

औराद शहाजानी ता. निलंगा जि. लातूर येथील भूमिपुत्र मेजर सुर्यकांत शेटगार यांना या वर्षीचा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा येथोचित गौरव करण्यात आला. सुर्यकांत शेटगार यांचे प्राथमिक व हायस्कूलचे शिक्षण महाराष्ट्र विद्यालय औराद या ठिकाणी झाले. सोबत शिक्षणाचा खडतर प्रवास होताच. कुणब्यांना दिसणाऱ्या जमिनी खूप असतात; पण त्या ओल्या व कोरड्या दुष्काळात नापीक होतात हे दुःख कुणाच्याही लक्षात येत नाही. १९७२ च्या दुष्काळात त्यांनी खडी केंद्रावरती खडे फोडण्याचे काम केले. त्यानंतर याच वर्षी सैन्यात भरती होऊन देशाच्या संरक्षणासाठी आपले योगदान दिले आहे. काही वर्षांपूर्वी ते सुभेदार मेजर या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. आपल्या साऱ्याच मुलांना त्यांनी उच्च विद्याविभूषित बनवलेले आहे. त्यांचा एक मुलगा डॉ. सुधीर शेटगार हा हृदयरोगतज्ज्ञ असून एम्स हॉस्पिटल दिल्ली या ठिकाणी अनेक वर्ष सेवा दिलेली आहे. सूर्यकांत शेटगार यांचे योगदान हे कुठल्याही सामाजिक, शैक्षणिक व देशभक्तीपर विधायक कार्यक्रमात आवर्जून  असते. त्यांना मिळालेल्या या योग्य पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

काव्यमित्र पुणे ही संस्था गेल्या २२- २३ वर्षापासून सातत्याने सामाजिक भान ठेवत कार्य करते. राजेंद्र सगर यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने विधायक उपक्रमाच्या माध्यमातून गुणवंत असलेल्या व  प्रसिद्धीपासून दूर असलेल्यांना न्याय देण्याचे काम ही संस्था करते. असे पुरस्कार देण्याच्या पाठीमागे प्रोत्साहन  व शाबासकीची थाप ही भावना तर असतेच पण त्यात तेवढाच प्रामाणिकपणाही असतो हे या संस्थेचे वैशिष्ट्य होय. महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रामध्ये काम करणारी एक अत्यंत विधायक चळवळ असून नव्या पिढीसाठी ऊर्जायनच आहे.


Post a Comment

0 Comments