Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*लातूर ऑफिसर्स क्लबच्या श्रावणी जगतापने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मिळविले ब्रॉन्झ मेडल; रुपये 7 हजार 500 चे रोख बक्षीस*

*लातूर ऑफिसर्स क्लबच्या श्रावणी जगतापने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मिळविले ब्रॉन्झ मेडल; रुपये 7 हजार 500 चे रोख बक्षीस*

लातूर :-(प्रतिनिधी):-* नुकतेच बारामती जि . पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ऑफिसर्स  क्लबच्या  श्रावणी जगताप हिने ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक ची वेळ ४१सेकंद देऊन ब्रॉन्झ मेडल व रोख ७ हजार ५०० रुपयेचे पारितोषक पटकाविले असून ,या स्पर्धेत महाराष्ट्रातून ६५५ विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन 
देण्यासाठी अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक जलतरण पट्टू वीरधवल खाडे तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त प्यारा ऑलिम्पिक खेळाडू  सुयश जाधव उपस्थित होते. तसेच या स्पर्धेचे उदघाटन  माजी केंद्रीयकृषी मंत्री शरदचंद्रपवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेत लातूर ऑफिसर्स क्लब ऍडव्हान्स स्विमिन्गची विद्यार्थिनी श्रावणी जगतापचा यांचा सत्कार व अभिनंदन ऑफिसर्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष जी.श्रीकांत,अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,सचिव तथा उपजिल्हाधिकारीजीवन देसाई,कोषाध्यक्ष डॉ.विश्वास कुलकर्णी, सहसचिव डॉ.अजय जाधव,क्रीडा समिती प्रमुख अजित भुतडा क्लब व्यवस्थापक अनिल जैन यांनी केले.
या विजयी जलतरण पट्टूला प्रशिक्षक डॉ.महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments