*संभाजीराव जनतेची धुळफेक थांबवा, 2017 मध्ये आलेल्या बिनविरोध ग्रामपंचायतला जाहीर केलेल्या 30 लाख रुपये निधीचे काय झाले ते अगोदर सांगा...
शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने*
निलंगा/प्रतिनिधी
तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बिनविरोध ग्रामपंचायत साठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रसिद्धी माध्यमाद्वारे घोषित केले आहे परंतु संभाजीराव जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणे थांबवा व 2017 मध्ये घोषित केलेले बिनविरोध ग्रामपंचायत साठी प्रत्येकी 30 लाख रुपये निधी का दिला नाही याचे कारण जाहीर करा असा सवाल शिवसेनेचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
निलंगा तालुक्यामध्ये एकूण 68 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरणार आहे ते त्या ठिकाणी महाविकास आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याच्या सूचना स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या असून सन्मानपूर्वक महाविकास आघाडीच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायती निवडणुका लढवून त्या गावांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल निलंगा तालुक्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी जिल्हाप्रमुख माने यांनी व्यक्त केले याबरोबरच बिनविरोध ग्रामपंचायतीला देण्यात येणाऱ्या निधीचे गाजर दाखवणाऱ्या भाजपा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घोषणेचा समाचार घेत ते म्हणाले संभाजीराव जनतेच्या डोळ्यांमध्ये धुळफेक करणे थांबवा जनतेने आपणाला पूर्णतः ओळखलेले आहे 2017 मध्ये सुद्धा आपण अशीच घोषणा केला होतात बिनविरोध येणाऱ्या ग्रामपंचायत साठी 30 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा आपणच केली होती त्याचे काय झाले हे अगोदर जाहीर करा *लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नसते* आमच्या माहितीनुसार आपण एकाही बिनविरोध ग्रामपंचायत साठी कसलाच निधी दिलेला नाही यामुळे पुन्हा जनतेच्या डोळ्यांमध्ये धुळफेक करणाऱ्या घोषणा आपण करू नये असा सणसणीत टोला शिवसेनेचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी आज केला आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य हरिभाऊ सगरे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे प्रशांत वांजरवाडे हे उपस्थित होते

Post a Comment
0 Comments