लातूर :-(प्रतिनिधी)
येथील मराठा सेवा संघाच्या वतीने रविवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ या वेळेत मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. पाच नंबर चौकातील राहिचंद्र मंगल कार्यालय येथे हा मेळावा होणार असून, विनाशुल्क नाव नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत १ हजारहून अधिक जणांनी नोंदणी केली असून, विधवा, घटस्फोटित, दिव्यांग, विदुर यांचाही परिचय मेळावा ठेवण्यात आलेला असून, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मराठा सेवा संघ लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments