निलंगा:-( प्रतिनिधी)
निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजन्मोत्सव समितीच्या नाविन्यपुर्ण उपक्रमातुन बालदिन साजरा करण्यात आला. १४ नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरा केला जातो.
शिवजन्मोत्सव समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे म्हणजेच गावातील युवक, ग्रामस्थ यांच्या वाढदिवसानिमित्त, राजकीय पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मिळणाऱ्या वह्या,पेन इ.शैक्षणिक साहित्य जिल्हा परीषद प्राथमिक शाळा तगरखेडा या शाळेतील विद्यार्थ्यांना बालदिनाचे औचित्य साधून देण्यात आले.गावातील प्रतिष्ठित नागरीक श्री.व्यंकट यादवराव बिरादार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले . यावेळी माजी सरपंच श्री. प्रकाश स्वामी,अस्लम सय्यद, अविनाश पाटिल,दिपक बिरादार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार हंरगुळे, मुख्याध्यापक चिल्लाळे सर, सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने दिल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदात भर पडून अभ्यासास प्रेरणा मिळेल.शिवजन्मोत्सव समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे गरजु विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.

Post a Comment
0 Comments