लातूर - प्रतिनिधी
न्यू डिजिटल मीडिया फाउंडेशनच्या लातूर शहर अध्यक्षपदी लक्ष्मण लंगर सर यांची निवड करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मीडिया भवन येथे आज दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. लक्ष्मण लंगर सर हे अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत तसेच पत्रकारितेमध्येही त्यांना विशेष आवड आहे. डिजिटल मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकार बांधवांसाठी काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करत असताना संघटनेचे सचिव विक्रांत शंके सर म्हणाले की, न्यू डिजिटल मीडिया फाउंडेशन ही संघटना जास्तीत जास्त पत्रकारांच्या हिताचे कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच उपाध्यक्ष रवी बिजलवाड सर यांनी येणार्या काळात अधिक मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांना संघटनेत सामील करून घेणार असल्याचे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश नरसिंगे सर यांनी लवकरच जिल्हाभरात पत्रकारांना पद वाटप करून काम वाढवणार असल्याचे सांगितले.
लक्ष्मण लंगर सर यांची निवड न्यू डिजिटल मीडिया फाउंडेशन चे अध्यक्ष व्यंकटेशजी नरसिंगे सर, उपाध्यक्ष रवी बिजलवाड सर, सचिव विक्रांत शंके सर यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती बँक अधिकारी रेश्मा भवरे मॅडम यांची होती. तसेच संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष रमण बेंबडे सर, कोषाध्यक्ष संतोष सोनवणे सर, सह सचिव अनिल कोकणे सर, सदस्य शुभांगी राऊत मॅडम, सदस्य विशाल सूर्यवंशी सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments