औराद शहाजनी:-( प्रतिनिधी)
आटरगा ता. भालकी (कर्नाटक) येथे झालेल्या महिला व्हॉलीबॉल स्पर्धामध्ये तगरखेडा येथील साहारा स्पोर्ट व्हॉलिबॉल क्लब च्या महिला खेळाडूनी द्वितीय क्रमांक पटकविला.
या स्पर्धामध्ये आठ महिला संघानी सहभाग नोदवळा होता व अंतिम सामना लातूर स्पायक विरूद्ध साहारा स्पोर्ट यांच्यामध्ये झाला. साहारा स्पोर्टने द्वितीय क्रमांक पटकावला या संघामध्ये सोनाली मठपती ,किरण धोगडे ,निकिता माने ,आवराले पल्लवी , निकिता पुट्टेवाड , इखारा शेख आदी खेळाडू होते. या खेळाडूचे प्रशिक्षक दिपक पाटील हे होते.
प्रशिक्षक दिपक पाटील यांनी व्हॉलिबॉल खेळांमध्ये खेळाडू घडविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जे यश संपादन करत आहेत त्यात प्रशिक्षक दिपक पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. आम्ही तगरखेडकर ग्रूप तर्फे त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment
0 Comments