*निलंगा येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेसह महाविकास आघाडी कडून आदरांजली*
निलंगा :-(प्रतिनिधी)
संपूर्ण हिंदुस्थानात हिंदुरुदय सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे असे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडितराव धुमाळ पंचायत समितीचे माजी सभापती अजितराव माने माजी नगराध्यक्ष हमीद भाई शेख शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य हरिभाऊ सगरे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील युवा सेनेचे जिल्हा समन्वयक दत्ता मोहोळकर शहर प्रमुख सुनील नाईकवाडे ॲड. अजित माकणे जगदीश लोभे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ धम्मानंद काळे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम सौदागर युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब मिरगाळे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे शुभम डांगे काँग्रेसचे गोविंदराव सूर्यवंशी शिवसेनेचे माधव नाईकवाडे राहुल बिरादार वामनराव सूर्यवंशी तम्मा कानडे सतीश फट्टे यशवंत बसपुरे प्रसाद मठपती दापका ग्रामपंचायत लाला पटेल माधव आर्य प्रदीप आर्य गुंडू गाडीवान शिवसेना महिला आघाडीच्या रेखाताई पुजारी शहर संघटिका दैवता सगर अरुणा माने राष्ट्रवादी महिला आघाडीच्या महादेवी पाटील मुन्नीबी मोमीन आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments