लातूर:-(प्रतिनिधी)
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत जागतिक वर्ल्ड बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रोग्रॅम राबवला जातो हा अभ्यास दौरा दि. 15 नोव्हेंबर 2022 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. शेतकरी अभ्यास दौरा हा उदगीर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय येथून हा दौरा नेरळ ता.कर्जत जिल्हा रायगड येथे जाणार आहे. तेथे शेतकऱ्यांना शून्य मशागत तंत्रज्ञानाबद्दल 2 दिवसीय प्रशिक्षण आयोजित केलेले आहे .त्यानंतर तळेगाव दाभाडे पुणे येथे फुलशेती शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर परतीचा प्रवास उदगीर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय येथे राहणार आहे. एस आर टी तंत्रज्ञान पहिला प्रयोग हा नेरळ येथे भात पिकावर झाला होता. तिथेच या एसटी तंत्रज्ञानाचा उगम हा झालेला आहे. SRT बद्दल चंद्रशेखर भंडसावळे दादा यांनी मार्गदर्शन केले. एस आर टी मुळे मजुरी वरील खर्च हा कमी झाला आहे तसेच जमिनी सुपीक झाल्या आहेत. जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढला आहे . वेळेची खूप बचत झाली वर्षातून तीन पिके घेता येत आहेत त्यामुळे उत्पादनामध्ये ही वाढ झाली.हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या खूप फायदेशीर आहे भविष्यात आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचवायच्या असेल तर एस आर टी शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. एस आर टी मुळे शेतकऱ्याची होणारी पिळवणूक टाळली जाईल. तसेच उत्पादनामध्ये ही मोठ्या प्रमाणावर वाढ होईल व जमीन ही सुपीक होतील. निंदनी कोळपणी ,नांगरणीचा ही खर्च वाचणार आहे. तसेच गादीवाफावर आपण लागवड केल्यास पिकाला जास्त बायोमास उपलब्ध झाल्याने जास्त उत्पादनामध्ये ही वाढ होणार आहे .अशी त्यांनी माहिती दिली. अनिल निवळकर यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली गादीवाफा कसा करावा त्याची उंची किती असावी कोणते तणनाशक मारावे तसेच मागील पिकाचे त्यांनी प्रत्यक्ष अवशेष दाखवले त्याचा फायदा काय एस आर टी कशा पद्धतीने फायदेशीर आहे जमीन कशा पद्धतीने भुसभुशीत होते. जमिनीमध्ये गांडूळाचे प्रमाण वाढलेले त्यांनी प्रत्यक्ष दाखवली तसेच जमीन ही सुवासिक होते. व कशाप्रकारे आपण जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढला हे ओळखू शकतो याबद्दल माहिती दिली. जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर बायोमास उपलब्ध झाल्यामुळे जमीन नीचे उत्पादन कशा पद्धतीने वाढते याबद्दल माहिती दिली. एस आर टी तंत्रज्ञानाचा वापर करत असलेले नऊ वर्ष अनुभव असलेले शेतकरी परशुराम आगविले यांनी आपले अनुभव शेतकऱ्यांना सांगितले एस आर टी मुळे उत्पादनात मोठी वाढ झाली .वेळेची बचत झाली. बाकीचा होणारा खर्च टाळला. जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढला. काही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांनी उत्तरेही दिली काही शेतकऱ्याचे म्हणणे होते जर आपण तणनाशकाची फवारणी केल्यास त्याचा उत्पादन वाढीवर परिणाम होतो का याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले. पिकावर कोणताही दुष्परिणाम होत नाही फक्त शिफारस केलेली तणनाशकेच वापर करावी याबद्दलही त्यांनी माहिती दिली योग्य ते प्रमाण पण वापरावे यासंदर्भात ही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळेस सुदर्शन बोराडे तंत्रज्ञान समन्वयक पोखरा,कृषी सहाय्यक फु सी .डी. श्री. सचिन घुमे, काशिनाथ राठोड , पाटील धीरज उपस्थित होते

Post a Comment
0 Comments