लातूर :-(प्रतिनिधी )
येथील श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थाद्वारा संचालित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातर्फे लातूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड आणि उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.विजयकुमार सोनी, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.संजय गवई आणि डॉ.कैलास पाळणे यांची उपस्थिती होती.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड आणि उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे यांनी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मराठवाड्यात पाच शाखा चालणारे हे एकमेव महाविद्यालयात असून पाच हजार गरजू, गरीब आणि होतकरू विद्यार्थी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय अभ्यासक्रम आणि समाजकार्य पदवी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाद्वारा शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यावसायिक समाजकार्यामध्ये गौरवास्पद आणि नेत्रदीपक कार्य केले जात आहे असे सांगून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गडचिरोली येथील केलेल्या कार्याचा गौरवही केला आणि महाविद्यालयामध्ये पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करण्यात आली. तेव्हा त्यांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार व्यक्त करून महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शनासाठी येण्याची विनंतीही मान्य केली.

Post a Comment
0 Comments